छ. शिवाजी महाराजांच्या अश्‍वारुढ पुतळ्याचे गुरुवारी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण

रेठरे बुद्रुक येथील कृष्णा कृषी महाविद्यालयाच्या प्रांगणात होणार सोहळा; शेतकरी मेळाव्याचेही आयोजन
शिवनगर : रेठरे बुद्रुक (ता. कराड) यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना संचलित जयवंतराव भोसले कृष्णा कृषी महाविद्यालयाच्या प्रांगणात उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याचे अनावरण गुरुवार दि. 13 जून रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दुपारी 2.30 वाजता होणार आहे. यानिमित्ताने कृषी महाविद्यालयाच्या प्रांगणात भव्य शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती कृष्णा कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांनी दिली आहे.
याबाबत प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे, की हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याची प्रेरणा आजच्या युवापिढीला मिळावी आणि त्यांच्या विचारांचे चिरंतन स्मरण व्हावे या उद्देशाने कृष्णा कारखान्याच्या संचालक मंडळाने कारखाना संचलित जयवंतराव भोसले कृष्णा कृषी महाविद्यालयाच्या प्रांगणात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा उभा केला आहे. या पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.
या सोहळ्याला अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष ना. नरेंद्र पाटील, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, महाराष्ट्र राज्य सहकारी परिषदेचे अध्यक्ष ना. शेखर चरेगावकर, श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीचे अध्यक्ष ना. डॉ. अतुल भोसले, कृष्णा खोरे महामंडळाचे उपाध्यक्ष ना. नितीन बानुगडे-पाटील, विधान परिषदेचे सदस्य आमदार पृथ्वीराज देशमुख, आमदार शंभुराज देसाई, आमदार शिवाजीराव नाईक, य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन मदनराव मोहिते, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. के. पी. विश्वनाथा, किसनवीर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मदनदादा भोसले, सातारा जि. प.चे माजी सभापती भीमरावदादा पाटील, सांगली जि. प. चे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, भाजपाचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, कराडच्या नगराध्यक्षा सौ. रोहिणी शिंदे, उपनगराध्यक्ष जयवंत पाटील, गटनेते राजेंद्रसिंह यादव, इस्लामपूरचे नगराध्यक्ष निशिकांत पाटील, माजी आमदार दिलीप येळगावकर, शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष जयंत पाटील, अर्बनफचे कुटुंबप्रमुख सुभाषराव जोशी, म्हाडाफचे संचालक मोहनराव जाधव, सातारा जि. प.चे सदस्य मनोज घोरपडे, सागर शिवदास, सौ. प्रियांका ठावरे, सौ. शामबाला घोडके, सातारा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य दिपक पवार, भरत पाटील, माजी जि. प. सदस्य सम्राट महाडिक, शेतीमित्र अशोकराव थोरात, वर्धन अ‍ॅग्रोफचे चेअरमन धैर्यशील कदम आदी मान्यवर प्रमुख उपस्थित राहणार आहेत.
या शेतकरी मेळाव्याला कृष्णा कारखान्याच्या सभासद, शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन कृष्णा कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले, व्हा. चेअरमन जगदीश जगताप, कार्यकारी संचालक सूर्यकांत दळवी, कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भास्कर जाधव यांनी केले आहे.