कुटुंबियांच्या भविष्यासाठी जमवलेली पुंजी मुलीने प्रियकराच्या मदतीने हडपली

म्हसवड : हमाली करून मुलांच्या तसेच कुटुंबियांच्या भविष्यासाठी जमवलेली आयुष्यभराची जमा पुंजी स्वताच्या पोटच्या मुलीने हडप केल्याची घटना म्हसवड येथे घडली असून यामध्ये सुमारे 14 लाख रुपये हडप केल्याची फिर्याद विठ्ठल ढगे यांनी म्हसवड पोलिसात दिली आहे. संशयित आरोपी कु. वंदना ढगे व तिचा प्रियकर राजकुमार ठाकूर शिवदूलारे यांना म्हसवड पोलिसांनी ताब्यात घेऊन न्यायालयापुढे उभे केले असता त्यांना पाच दिवसांचा पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी विठ्ठल बाळू ढगे वय 57 वर्षे रा. म्हसवड हे हमाली करून आपली गुजराण करीत आहेत.त्यांची पत्नी नर्मदा हिला पक्षपात झाला असून ती अशिक्षित असून त्यांचा मुलगा नितीन हा कामानिमित्त त्याच्या कुटुंबासह म्हसवड येथिल शिक्षक कॉलनी येथे राहतो.त्यांची एक मुलगी सीमा ही विवाहित असून ती विडणी ता. फलटण जि सातारा येथे तिच्या सासरी असते तर दुसरी मुलगी वंदना ही शिक्षणासाठी पुणे येथे असते.
फिर्यादि विठ्ठल ढगे हे हमाली करून येणार्‍या पैश्यामध्ये कुटुंबाचा खर्च अत्यंत काटकसरीने करीत व वंदना हिस दरमहा शिक्षणासाठी 10 हजार रुपये पाठवीत होते.
दोन वर्षयापुर्वी आठ दिवस कॉलेजला सुट्टी असल्याचा बहाणा करून ती म्हसवडला आली.त्यावेळी फिर्यादी विठ्ठल ढगे हे हमालिसाठी बाहेरगावी गेले होते.यासंधीचा फायदा घेत संशयित आरोपी वंदना हिने आपल्या अशिक्षित व भोळ्या स्वभावाच्या आईस दुसर्‍या बँकेत जादा व्याज मिळेल यासाठी एस बी आय बँकेतील पैसे काढून दुसर्‍या बँकेत पैसे टाकू असे सांगून खाजगी रिक्षाने म्हसवड येथील एस बी आय बँकेत घेऊन गेली व तेथील अधिकार्‍यांना माझी आई आजारी असून तिला मोठ्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावयाचे असून आम्हाला पैशाची गरज आहे असे पाठवून दिले व एस बी आय खातेक्रमांक 35632460063 या खात्यामध्ये असणारे 4लाख 93 हजार 500 रुपयांची रक्कम दिनांक 23 मे 2016 रोजी काढून घेतले व नंतर घरी येऊन घरातील साडेतीन टोळ्यांचे सोन्याचे दागिने यामध्ये कर्णफुले,मिनिघटन, दोन अंगठ्या असा सुमारे 55 हजार रुपयांचा ऐवज तसेच म्हसवड येथील एस बी आय बँकेचे दुसरे खाते क्रमांक 35632460052 या चे नवीन -ढच् कार्ड व त्याचा पिन नंबर असलेला बंद लिफाफा घेऊन त्याच दिवशी ती संध्याकाळी पुण्याला गेली.
वंदना ही पुण्यास पोहचल्यानंतर दुसर्‍या दिवसांपासून पुण्यातील धनकवडी,सहकारनगर,औखसरगरनागर,पुणे सिटी,बिबवेवाडी,जनप्रभोधिनी,पुणे,एस पी कॉलेज,दत्तनगर,देहूरोड,चव्हाण नगर ,के के मार्केट दि 19/07/2016 पर्यंत या भागातील विविध -ढच् मधून 8लाख 19 हजार रुपये काढले.
अश्याप्रकारे वंदना हिने तिचा प्रियकर राजकुमार ठाकूर शिवदूलारे या दोघांनी संगतमताने फिर्यादी विठ्ठल ढगे यांच्या खात्यातून 8 लाख 19 हजार,तर पत्नी नर्मदा हिचे खात्यातून 4 लाख 93 हजार 500 व सुमारे 55 हजार रुपयांचे दागिने असा एकूण 13 लाख 67 हजार 500 रुपये हडप केले असल्याचे फिर्यादीत म्हंटले असून संशयित आरोपी वंदना विठ्ठल ढगे व तिचा प्रियकर राजकुमार ठाकूर शिवदूलारे यांना म्हसवड पोलिसांनी ताब्यात घेऊन म्हसवड येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्या दोघांना 5दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे
अधिक तपास स पो नि मालोजीराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पो ह नंदकुमार खाडे हे करीत आहेत.