व्यापार्‍यावर केलेल्या हल्यातील फरारी संशयित आरोपींना दोघांना अटक

फलटण : फलटण मधील व्यापार्‍यावर केलेल्या हल्यातील फरारी संशयित आरोपींना बार्शी जि . सोलापुर मधुन दोघांना अटक केली असून त्यांना न्यायालयाने रिमांड वरती घेण्याचे आदेश दिले आहेत अशी माहिती पोलीस निरीक्षक पोमन यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की फलटण शहर पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 19 : 3, 2019 भा.द.वि. कलम 309, 397 , 294, 34 प्रमाणे गुन्हा दाखल असून दिनांक 02. 06. 2015 रोजी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास फिर्यादी नुसार प्रितम गांधी यांचे वर हल्ला घडला होता या मध्ये प्रितम गांधी हे त्यांचे अरविंद क्लॉथ एम्पोरीयम बंद करून लमीनगर येथे रहाते घरी पार्किंग मध्ये आले असता प्रितम गांधी यांचा ओरडण्याचा आवाज आला म्हणून त्यांचा मुलगा पार्श्व प्रितम गांधी वय 17, रा. फलटण याने गॅलरीतून बाहेर पाहीले असता एक अनोळखी इसम प्रितम गाधी यांच्या पाठीत चाकूने वार करीत होता . दुसरा अनोळखी इसम याने डोळयात मिरची पावडर टाकीत होता. म्हणून फिर्यादी हे पळत आले व त्यांनी संशयित आरोपी अनिकेत नरेंद्र कदम वय 20 रा. सगुणामाता नगर फलटण यास लोकांच्या मदतीने धरुन ठेवले व पोलिसांनी सदर गुन्हयात त्यास अटक केली गुन्हयातील इतर दोन आरोपी हे दि.2 जून गुन्हा केले पासुन फरार होते सदर संशयित आरोपींना तपास कामी फलटण शहर पोलीसांची एक दिम गुन्हा घइले दिवसापासुन पोलीस निरीक्षक प्रताप पोमण फलटण शहर पोलीस ठाणे यांनी पथकांना आदेश देवुन रवाना केलेली होती.
सदर संशयित आरोपी बारामती, जेजुरी, वडगाव निंबाळकर, सांगवी, शिरवली, सोनगाव , कर्‍हावाघज , माळेगाव या भागामध्ये लपत होते त्यांचे माघावर तपास पथकास हुलकावणी देत होते आरोपी हे बार्शी ता.बार्शी जि . सोलापुर येथील नगर नातेवाइकांकडे लपुन बसले असल्याची माहिती मिळाल्याने काल शनिवारी दि. 8 जून 2019 रोजी रात्रौ 10 वाजता छापा टाकला असता ते पोलीसांना बघुन पळून गेले त्यानंतर त्यांचा एक किलोमिटर पाठलाग करुन पोलीस उप निरीक्षक घनकर च त्याचे टिमने सदर दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले यातील आरोपी नावे साजन पवन भोसले वय 20 वर्ष रा. सोनगाव बंगला ता. फलटण जि. सातारा, समीर हणमंत शितोळे वय 19 वर्षे रा. सोनगाव बंगला ता. फलटण जि . सातारा, यांना अटक केली असुन यातील साजन भोसले हा रेकॉर्ड वरील गुन्हेगार असून याचेवर यापुर्वी जबरी चोरी, दरोडा या सारखे गुन्हे वडगाव निंबाळकर ता. बारामती पोलीस ठाणे या ठीकाणी दाखल आहेत, अशा प्रकारेचे सदरचे आरोपी गुन्हेगारी वृत्तेचे असल्याचे सांगितले, सदर आरोपींचा पोलीसांनी 3 दिवस सतत भागातर राहुन मेहनत करुन ताब्यात घेतले आहे. आरोपींना आज रविवारी दि.9 जून रोजी न्यायालयात हजर केले असतान्यायालयाने पोलीस कस्टडी रिमांड मंजूर केली आहे. त्यांचेकडे अधिक विचारपुस करुन गुन्हे उघडकीस आणन्यासाठी प्रयत्न आहेत.
सदरची कारवाई मध्ये पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते मॅडम, अपर पोलीस अधिक्षक धिरज पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी सुहास गरुड़ सो, पी. डी. पोमण यांचे मार्गदर्शनाख़ाली पोलीस उप निरीक्षक, संदीप बनकर, पोना. 226 सर्जेराव सुळ, सुजित मेंगागडे,नितीन चतुरे यांनी सदरची कारवाई केलेली आहे.