रामराजेंची भाटगिरी कृष्णाखोरेची 32 हेक्टर जागा बारामतीकरांना

रामराजे तर अल्प उत्पन्न गटातील नेते खोटे प्रतिज्ञापत्र करून फ्लॅट मिळवला: आ. गोरे
सातारा : बारामतीची इमाने इतबारे भाटगिरी केली म्हणून 20 वर्षे मंत्रीपद,सभापतीपद मिळाले. या कालखंडात पाठबंधारे विभागाची सुमारे 32 हेक्टर जागा बारामतीकरांच्या विविध संस्थाकरिता त्यांच्या घशात घातल्या. खंडाळा फलटणच्या मतदार आणि शेतकर्‍यांच्या जीवावर राजकिय कार्यकिर्द उभी राहिली. त्या मतदार शेतकर्‍यांना पाणी मिळतंय तर या निर्णयाचे स्वागत करण्याऐवजी फार मोेठे संकट कोसळल्यासारखे अवस्था त्यांची झाली आहे. रामराजेंवर आता मिरजच्या कृष्णामाई रूग्णालयात उपचार करण्याची गरज आहे. त्यांनी आता विश्रांती घ्यावी अशी चौफेर टिका आ. जयकुमार गोरे यांनी पत्रकार परिषदेत केली. दरम्यान, रामराजेची पिवळी शिधा पत्रीका आहे. अल्प उत्पन्न गटातील असल्याचे खोटे प्रतिज्ञापत्र सादर करून त्यांनी मुंबईत शासकिय फ्लॅट घेतल्याचा गौप्यस्फोट ही त्यांनी केला.
आ. जयकुमार गोरे म्हणाले, लोकसभा निवडणुकींच्या काळात रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी, खंडाळा, फलटण, माळशिरस या तीन दुष्काळी तालुक्यांना पाणी देण्याचे आश्‍वासन दिले होते. त्या आश्‍वासनाची पुर्ती होताना बारामतीचे पाणी बंद करण्याचा निर्णय झाला. दुष्काळी भागाला पाणी मिळले याचा आनंद रामरोजेंना होण्या ऐवजी त्यांच्यावर संकट कोसळल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली. त्याचे कर्म उघडे पडल्याने आता जनतेची दिशाभूल करीत आहेत, असे सांगून ते म्हणाले, पाटबंधारे मंडळाच्या ज्या बैठका झाल्या त्यामध्ये पहिल्या तीन बैठकांच्या अध्यक्षपदी रामराजे नाईक निंबाळकर होते. 4 एप्रिल 2007 रोजी झालेल्या बैठकित निरा-देवधर आणि गुंजवणी या दोन्ही धरणांच्या कालव्यांचे काम पूर्ण नसल्याने नियोजीत लाभ क्षेत्रातील पाणी वापर होत नसल्याची बाब विचारात घेवून या धरणातील उपलब्ध साठया पैकी 60 टक्के पाणी निरा कालव्यासाठी तर 40 टक्के पाणी उजव्या कालव्यासाठी देण्याचा 5 वर्षाचा ठराव झाला. हेच पाणी बारामतीकडे वळविण्यात आले, मंत्रीपद स्वत:कडे असताना या पाच वर्षात या कालव्यांचे काम का झाले नाही, या प्रश्‍नाचे उत्तर देण्याऐवजी ते जणतेची दिशाभूल करित आहेत.
याच पध्दतीने 4 एप्रिल 2012 रोजी दुसरा ठराव रामराजेंनी केला आणि पुन्हा हे पाणी बारामतीकडे वळविले गेले, याबाबतचा पुरावाच पत्रकार परिषदेत मांडला. आपल्या राजकिय जीवनात इमाने इतबारे सेवा केल्यानेच मंत्रीपद व सभापतीपदावरच असताना बारामतीची सेवा त्यांनी केली असे स्पष्ट सांगून आ. गोरे म्हणाले, ते जेष्ठ आहेत आम्हाला त्यांचा आदर आहे, पण वय वाढले कि मेंदू काम देत नाही त्यामुळे त्यांना मिरजच्या कृपामाईच्या रूग्णालयात उपचाराची गरज आहे. आता त्यांनी विश्रांती घ्यावी असा सल्ला ही त्यांनी दिला. आमच्यावर पिसाळलेली कुत्री,भुक्कड, अशा शब्दांत त्यांनी त्रागा व्यक्त केला त्यांना हे माहित नसावे पिसाळलेली कुत्री चावल्यावर 32 इंजेक्शने घ्यावी लागतात. ती सहन करण्याइतपत त्यांची क्षमता नाही, आणि तुमचे वय झाल्याने तुमच्यावर उपचार करता येणार नाहीत.
प्रत्येक गोष्टीला काळ आणि वेळ यावी लागते. आगामी विधानसभेच्या निवडणूकीत आमदार कोणाला करायचे हे फलटणचे लोक ठरवितील आता रामराजेंच्या पापाचा घडा भरला आहे. केलेल्या पापापासून फलटण आणि खंडाळा शेतकर्‍यांचे लक्ष विचलित करण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे. आम्हाला गुंड म्हणता तुमच्या अवती भोवती आणि तुमच्या बंगल्यावर कोण असतं, याची माहिती आम्हाला आहे. असे स्पष्ट करून आ. गोरे म्हणाले, रामराजे धुतल्या तांदळासारखे असल्याचा अविरर्भाव करत आहेत त्यांची शिधा पत्रीका (रेशनिंग कार्ड ) पिवळी आहे. अल्प उत्पन्न गटात असल्याचे प्रतिज्ञापत्र सादर करून त्यांनी शासनाच्या कोटयातून फ्लॅट मिळवल्याचा गौप्यस्फोटही त्यांनी केला.
रामराजेंनी 13 एप्रिल 2005 रोजी कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या बैठकित निरा-डाव्या कालव्यातील सर्व्हे नं 133,48,60,58,59 लगतची 13.18 हेक्टर जागा शरद पवारांच्या बारामती येथील विद्या प्रतिष्ठानला देण्याचा ठराव केला. याच कालव्यावरील सर्वे नं 270 मधील 2.10 हेक्टर जागा अनंत स्मृती प्रतिष्ठान व संशोधन केंद्राला दिली तर शिवाजी नगर पुणे येथील मुठा डावा कालवा लगतची शेतकी महाविद्यालयास 1 हेक्टर, अंनंत स्मृती प्रतिष्ठान संशोधन केंद्र यास बांधकाम व वनिकरणास देण्यात आली, महामंडळाच्या ताब्यात असलेली वरसगाव धरण परिसरातील सर्वे नं 21,22,23,26,27,34,41,42,43, 118,119, व 125 मधील 12 हेक्टर 368 आर हि जागा लवासा कार्पोरेशन लिमिटेड या संस्थेस पर्यटण विकासासाठी विकत देण्याचा ठराव करण्यात आला. जळोची ता. बारामती येथील निरा -डावा कालवा सर्वे नं 54 ते 59 लगतची 3 एकर जागा शरदचंद्रजी स्काउट गाईंड अ‍ॅण्ड ट्रेनिंग या बारमतीच्या संस्थेस देण्यासाठी चा ठराव करण्यात आला अशी धक्कादायक माहिती आ. गोरे यांनी देतानाच हि रामराजेंची बारामतीकरांसाठी भाटगिरी असल्याची तोफ डागली. गोरे यांनी दिली.
पाटबंधारे मंत्री असल्याने त्यांची चौकशी होणार कशी? सध्याचे सरकार हे अल्पमतात असल्याने दबाव तंत्राचा वापर त्यांच्यावर केला जातो. ही वस्तूस्थिती असताना जनतेचा बुध्दीभेद करण्यासाठी आ. पृथ्वीराज चव्हाणांचे नाव पुढे केले जाते. वास्तविक आ. चव्हाण यांनीच त्यांची चौकशी लावल्याची त्यांनी सांगितले.