‘डोळयात तेल घालुन चांगले काम करा’

कराड: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर सुधारित मतदान प्रक्रिया समजावुन घ्या. मतदाना दररम्यान कोणतीही चूक होणार नाही, याची दक्षता घ्या आणि डोळयात तेल घालुन चांगले काम करा अशा सुचना सहायक निवडणुक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी श्रीमती विधुत वरखेडकर, प्रांताधिकारी हिंमत खराडे यंानी येथे दिल्या.
लोकसभा निवडणुकीसाठी 23 एप्रिल रोजी मतदान होत त्या पार्श्‍वभुमीवर निवडणुकीसाठी कराड उत्तर व दक्षिण मतदारसंघात नेमलेल्या एक हजार 710 कर्मचार्‍यांंचे प्रशिक्षण येथील यशवंतराव चव्हाण स्मृतिसदन झाले. त्यावेळी ते बोलत होते. तहसीलदार अमरदीप वाकडे, सहायक जिल्हापुरवठा अधिकारी वर्षा शिंगण, निवासी नायब तहसीलदार अजित कुराडे उपस्थित होते.
श्री. खराडे यांनी मतदान प्रक्रियेतील सुधारित प्रक्रिया समजावुन सांगितली.
त्याचबरोबर व्हीव्हीपॅट मशिनसंदर्भात माहिती देऊन त्याच्या वापराबाबत प्रात्यक्षिकाद्वारे माहिती देण्यात आली त्यानंतर श्रीमती वरखेडकर यांनी मतदानादरम्यान नेमलेल्या अधिकार्‍यांनी कोणती काळजी घ्यावी, त्यांची जबाबदारी काय आहे. याबाबत मार्गदर्शन केले. प्रशिक्षणास गैरहजर असणार्‍या कर्मचार्‍यंावर लोकप्रतिनीधीत्व अधिनियमाच्या कलमानुसार कारवाई करण्यात येईल, असाही इशारा श्रीमती वरखेडकर व श्री. खराडे यांनी दिला आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभुमीवर कराड यंाची कर्मचारी नेमण्यात आले आहेत. संबंधित कर्मचार्‍यंाना आज दिवसभर मतदान प्रक्रियेतील त्यांच्या कामकाजाची माहिती देण्यात आली. त्यात असलेल्या प्रश्‍नांचीही अधिकार्‍यांनी कर्मचार्‍यांना उत्तरे दिली. त्यानंतर संबंधित कर्मचार्‍यांची परीक्षा घेण्यात आली.