ज्ञानाची शिदोरीतून 28 हजाराचे शैक्षणिक साहित्य वाटप

तळमावले: ज्ञानाची शिदोरी या उपक्रमांतर्गत ग्रामीण भागातील गरजू होतकरु विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य मिळाल्यामुळे या विद्यार्थ्यांच्या चेहर्‍यावर हसू उमटले होते. पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगांव) येथील स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने ज्ञानाची शिदोरी हा उपक्रम राबवला होता. या उपक्रमाला भरभरुन प्रतिसाद मिळाला. अगदी नवदांम्पत्यानेही लग्नात ज्ञानाची शिदोरी उपक्रमास मदत करुन एक वेगळा आदर्श समाजासमोर ठेवला. याशिवाय वाढदिवसानिमित्त या उपक्रमास सहकार्य केले आहे. हेच या उपक्रमाचे यश आहे. ज्ञानाची शिदोरी या उपक्रमांतर्गत सुमारे 28 हजारांचे शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.या साहित्याचे नुकतेच प्रातिनिधिक स्वरुपात जि.प.शाळा भरेवाडी या शाळेत वितरण करण्यात आले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र पवार, स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक/अध्यक्ष संदीप डाकवे, उपशिक्षक जीवन पाटील, छायाचित्रकार अनिल देसाई, भाऊसोा भिसे व अन्य मान्यवर उपस्थित होते. मुलांना साहित्य खरेदी करावे लागू नये यासाठी हे साहित्य पहिल्याच दिवशी मिळावे म्हणून यापूर्वीच संबंधित शाळेत ज्ञानाची शिदोरी उपक्रमातील साहित्य पोहोच केले आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भरेवाडी, चाळकेवाडी, लोहारवाडी, बामणवाडी, मोळावडेवाडी, कुठरे, जाधववाडी, कराड नगरपरिषद शाळा क्रं.9 कराड, न्यू इंग्लिश स्कूल काळगांव या शाळांना तसेच इतर गरजू विद्यार्थ्यांना जमलेले साहित्य पुरवण्यात आले आहे. तसेच येवती विद्यालयातील 15 मुलांना गणवेश देण्यात आले आहेत. मुंबई-पुणे येथे नोकरी-व्यवसायानिमित्त असलेल्या लोकांना प्रत्यक्ष साहित्य देता येत नव्हते म्हणून त्यांनी पैसे पाठवून मदत केली आहे. पार्श्‍वगायिका कविता राम, प्रदीप शिंगण (शेठ), आबासाहेब शिबे (शेठ), सुनील पवार, डॉ.कोमल शेठ, ओंकार शेठ, कृष्णा चिंचुलकर, सुरज शिंदे, सतीश पवार, प्रमोद माने, कु.तनिष्का मोहिते, अथर्व शेळके, सचिन मोरे (फौजी), संजय डाकवे, नुपुर दळवी, मोहन डाकवे, शिवाजी मस्कर, विकास जाधव, विशाल डाकवे, नवनान जाधव, राजेंद्र पवार (गुरुजी), राजेंद्र कुंभार, स्वाती पाटील (मॅडम) ग्रामसेवक बाळकृष्ण सुतार, माजी शिक्षणविस्तारअधिकारी तानाजी शेवाळे संजय पाटील व अन्य लोकांनी यात आपले योगदान दिले आहे. तसेच मराठी चित्रपटसृष्टीतील नामवंत स्टार्स अभिनेत्री जुई गडकरी, अभिनेत्री वृषाली हटाळकर, पार्श्‍वगायिका कविता राम, अभिनेत्री राधिका पाटील, अभिनेत्री सोनल पवार, अभिनेत्री अमृता उत्तमवार, अभिनेत्री सायली काळे, अभिनेते स्वप्नील काळे, अभिनेत्री मयुरी आवड, अभिनेत्री प्रियांका करंदीकर, गायिका रेश्मा फावडे, अभिनेत्री वनिता खरात, अभिनेते उमेश बोळके, बालअभिनेत्री श्रावणी अभंग यांनी आपल्या आवाजात व्हिडीओ तयार करुन तो सोशल मिडीयावर व्हायरल केल्यामुळे हा उपक्रम  जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोच झाला. हे करण्यासाठी एफयु इव्हेन्टस् अ‍ॅन्ड मॅनेजमेंटचे उमेश माने (आयडी 509) यांची मोलाची मदत झाली आहे. यापूर्वीही स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने मोफत वह्या वाटप, स्कूल बॅग-संगणकासाठी आर्थिक सहकार्य, एक वही-एक पेन, माणूसकीच्या वह्या, कुठरे-जांभूळवाडी शाळेला प्रतिमा वाटप, गुणवंत विद्यार्थ्यांचा घरी जावून सत्कार असे नावीण्यपूर्ण शैक्षणिक उपक्रम राबवले आहेत त्या माध्यमातून सुमारे 180 मुलांना शैक्षणिक साहित्याची मदत मिळाली आहे. या उपक्रमांचे समाजाच्या सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. याशिवाय नाम फाऊंडेशनला मदत, वृक्षारोपण, पत्रिकेतून समाजप्रबोधन, मान्यवरांचे स्वागत शाल ऐवजी पुस्तकाने स्वागत प्रारंभ, गणेशमंडळास भेटी देवून मानपत्र प्रदान, किल्ले बनवा स्पर्धा, 83 चित्रे रेखाटून शुभेच्छा, एक अक्षर गणेश कलाकृती उपक्रम मदत, गणेशोत्सव वार्तांकन स्पर्धा, माजी सैनिक हणमंत पाटील मदत, एक दिवा जवानासांठी, ग्रंथतुला करुन पुस्तके वाटप, दिवाळी अंक स्पर्धा, एक ओंजळ अनाथांसाठी,, वारीचे पोस्टर रेखाटून शुभेच्छा, कॅलिग्राफीतून जवानांना सलाम, अक्षरश्री उपक्रमातून केरळला मदत, ऊसतोड मजूरांना शाल वाटप, प्राईड ऑफ स्पंदन अ‍ॅवार्ड, सॅल्युट कार्ड स्पर्धा, सेल्फी विथ गुढी स्पर्धा, भारत के वीर खात्यात मदत इ. उपक्रम राबवले आहेत. लोकांनी मोठया प्रमाणावर सहकार्य केल्यामुळे गरीब, गरजू होतकरु विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक साहित्य देण्यामध्ये खारीचा वाटा स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने घेता येत आहे, याचे मनापासून समाधान वाटते असे मत स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक/अध्यक्ष संदीप डाकवे यांनी व्यक्त  केले.स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून नावीण्यपूर्ण उपक्रम राबवण्यासाठी संदीप डाकवे, उपाध्यक्ष आप्पासोा निवडूंगे, सचिव रेश्मा डाकवे व पदाधिकारी यांचे विशेष सहकार्य लाभते. स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टच्या काही उपक्रमास चित्रपट सृष्टीतील मान्यवर कलावंतानी देखील भरभरुन सहकार्य केले आहे. यामध्ये सुप्रसिध्द पार्श्‍वगायिका व अभिनेत्री कविता राम, अभिनेते सागर कारंडे, अभिनेते जगन्नाथ निवंगुणे, सुप्रसिध्द लावणीसम्राज्ञी विजया पालव, अभिनेते सचिन पाटील इ.नी शालेय साहित्य देवून या स्पंदनच्या उपक्रमाला ङ्गचार चाँदफ लावले आहेत.वसा सामाजिक बांधिलकीचा हे ब्रीद वाक्य घेवून कार्य करत असलेल्या टस्टच्या कामाचे सर्वत्र कौतुक होत आहे.