बोंडारवाडी धरणाच्या ट्रायलपीटचे काम तत्काळ सुरू करणार : नामदार शंभूराज देसाई यांचे आश्वासन

केळघर: बोंडारवाडी धरणाच्या ट्रायलपीट घेण्याचे काम प्रशासनाच्या वतीने 14 जानेवारीपासून सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे बोंडारवाडी धरण कृती समितीने घेतलेला चक्काजामचा निणर्य तूतार्स स्थगित करावा, राज्यशासनाच्या वतीने बोंडारवाडी धरणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी कृती समितीला सवर्तोपरी सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.
प्रशासनाने ट्रायलपीटचे काम वेळेत पूर्ण न केल्यास पुन्हा अधिक तीव्रतेने पुढील महिन्यात 17 फेब्रुवारीला बोंडारवाडी धरण कृती समिती लोकशाही मागार्ने चक्काजाम आंदोलन करेल, असा इशारा बोंडारवाडी धरण कृती समितीचे निमंत्रक विजयराव मोकाशी यांनी आज केळघर येथे कृती समितीच्या वतीने आयोजित केलेल्या बैठकीत दिला.
बोंडारवाडी धरणास प्रशासकीय मान्यता मिळून देखील जलसंपदा विभाग ट्रायलपीट घेण्यासाठी टाळाटाळ करीत होता. लोकप्रतिनीधींनी वेळोवेळी शासनस्तरावर पाठपुरावा करून देखील तसेच धरण कृती समितीतडूनही पाठपुरावा केल्यानंतरही याची दखल घेतली जात नाही.त्यामुळे बोंडारवाडी धरण कृती समितीने 13 जानेवारीला मेढा येथे चक्काजाम आंदोलन करण्याचा इशारा देखील दिला होता.
याबाबतची माहिती सावर्जनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांना समजल्यानंतर या प्रश्न मार्गी लावण्यासाठी कृती समितीबरोबर मी बैठक घ्यावी अशी सुचना केल्यानंतर जिल्हाधिकारी कायार्लयात कृती समिती व जलसंपदा विभागाच्या आधिकाऱयांच्या बैठकीचे आयोजन नामदार देसाई यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आले होते.
या बैठकीला निवासी जिल्हाधिकारी सुनील थोरवे, जलसंपदा विभागाचे श्री. धुळे, श्री. बरगे, श्री. गायकवाड, पोलीस उपअधिक्षक श्री. साळुंखे, जावळीचे तहसीलदार शरद पाटील, जिल्हा परिषद सदस्या अचर्नाताई रांजणे, कृती समितीचे निमंत्रक विजयराव मोकाशी, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य एकनाथ ओंबळे, मोहनराव कासुरडे, रामभाऊ शेलार, बबनराव बेलोशे, विश्वनाथ धनावडे, प्रा. तुकाराम ओंबळे, सिताराम सुरवे, बजरंग चौधरी, संपत कासुरडे, सुरेश कासुरडे. विलास शिरके, श्रीरंग बैलकर, साक्षी उंबरकर आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी नामदार देसाई म्हणाले, जावळी तालुक्यातील मेढा, केळघर विभागातील 54 गावांसाठी बोंडारवाडी प्रकल्प होणे गरजेचे आहे. याची मला जाणीव आहे. हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी सवार्ंना विश्वासात घेवून प्रशासनाने कायर्वाही करावी.14 जानेवारी पासून संबंधित विभागाने या धरणाच्या ट्रायलपीट चे काम सुरू करावे, असा आदेश मंत्री देसाई यांनी यावेळी दिला..याप्रसंगी कृती समितीच्या वतीने गेल्या अनेक वषार्ंपासून जो पाठपुरावा केला जात आहे, याची सविस्तर माहिती निमंत्रक श्री. मोकाशी यांनी दिली.
दरम्यान बोंडारवाडी धरण कृती समितीच्या वतीने आज केळघर येथे बैठक घेवून प्रशासन ट्रायलपीट 14 जानेवारीपासून सुरू करणार असल्याने दिनांक 13 जानेवारीचे मेढा येथील चक्काजाम आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात येत असून प्रशासनाने दिलेला शब्द न पाळल्यास पुन्हा आंदोलनाचा मारग मोकळा असल्याचे श्री. मोकाशी यांनी सांगितले.