कोरेगाव: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक-अध्यक्ष खा. शरद पवार यांच्या भाजप सरकारने सुडबुध्दीने ईडीद्वारे कारवाई केल्याने संतप्त झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पुकारलेल्या कोरेगाव बंदला शुक्रवारी शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.
भाजपने खा.शरद पवार यांना लक्ष्य करुन ईडीद्वारे त्यांच्यावर सुडबुध्दीने कारवाई केल्याच्या निषेधार्थ आ. शशिकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कोरेगाव तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकार्यांनी कोरेगाव बंदची हाक दिली होती.
जिल्हाध्यक्ष सुनील माने, युवकचे जिल्हाध्यक्ष तेजस शिंदे यांच्या नेतृत्वाखाली विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष अरुण माने, तालुकाध्यक्ष भास्कर कद, कार्याध्यक्ष श्रीमंत झांजुर्णे, पंचायत समितीचे सभापती राजाभाऊ जगदाळे, पंचायत समितीचे माजी सभापती संजय झंवर, शिवाजीराव महाडिक, बाजार समितीचे सभापती प्रताप कुमुकले-निकम, निलेश जगदाळे, जयवंत घोरपडे, कोरेगावच्या उपनगराध्यक्षा संगीता बर्गे यांच्यासह पदाधिकारी, नगरसेवक व कार्यकर्त्यांनी कोरेगाव बंद ठेवण्याचे आवाहन केले होते. त्यास प्रतिसाद देत व्यापारी, उद्योजक व व्यावसायिकांनी उत्स्ङ्गूर्तपणे बंद पाळला. बंदला शंभर टक्के प्रतिसाद मिळाला असून, अत्यावश्यक सेवा वगळता बाजारपेठ पूर्णत: बंद होती.
पोलीस उपअधीक्षक सुहास गरुड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनील गोडसे, सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस कर्मचार्यांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता.
खा. शरद पवार यांच्यावर ईडीने केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ राष्ट्रवादीतर्ङ्गे कोरेगाव बंद
RELATED ARTICLES