मल्हारपेठमधील संत तुकाराम विद्यामंदिरचे कबड्डी स्पर्धेत यश

मल्हारपेठ : मल्हारपेठ येथील श्री संत तुकाराम विद्यामंदिर च्या मुलींच्या कबड्डी संघाची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
पाटण येथे क्रीडा विभागातर्फे घेणेत आलेल्या सतरा वर्षाखालील गटात मल्हारपेठ च्या मुलींच्या संघाने उज्ज्वल यश प्राप्त केले व त्यांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या संघातील सर्व खेळाडूंना विद्यालयाचे क्रीडा शिक्षक सुहास मोहिते यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले आहे. प्राचार्या सौ शोभा जगदाळे सर्व शिक्षक तसेच विद्यार्थी पालक ग्रामस्थ व शाळा व्यवस्थापन समिती तर्फे सर्वांचे हार्दिक अभिनंदन केले आहे.