रहिमतपूर : सर्व समाजातील नागरिकांनी वैज्ञानिक दृष्टीकोन ठेवून वास्तुदोष, कालसर्प, शनिची साडेसाती, मंगळ,गुरू यांचा भौगोलिक अभ्यासपूर्ण माहिती घ्यावी व नंतर योग्य दिशा ठरवून योग्य निर्णय घेण्यात यावा. असे प्रतिपादन जेष्ठ खगोलशास्त्रज्ञ प्रा.डॉ. नितिन शिंदे यांनी केले. ते रहिमतपूर ता.कोरेगाव येथील वीरशैव लिंगायत तिराळीसमाज जंगम मठामध्ये झालेल्या कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सी. एम. खामकर हे होते.
यावेळी बोलताना डॉ नितीन शिंदे पुढे म्हणाले की, नागरिकांनी श्रध्दा ठेवावी पण अंधश्रद्धा ठेवू नये. यावेळी त्यांनी तारे व अवकाशातील सांगड घालून दिली. माणूस किती मुर्ख असतो जे पत्रिका कुंडली सारख्या थोतांड गोष्टीवर विश्वास ठेवून स्वत:चे वाटोळे कसे करतो याचे सुंदर स्पष्टीकरण दिले,तसेच वास्तुदोष, कालसर्प, शनिची साडेसाती, मंगळ, गुरू, काय आहेत त्याबद्दल भोंदू बुवाबाबा कशी अंधश्रद्धा पसरवतात. हे त्यांनी हसत खळत सफर विश्वाची या व्याख्यानात सहजतेने सांगितले. यावेळी कृष्णा भिवा भोसले उपस्थित होते.
यावेळी शिवाजी शिंदे, अॅड.अमर माने, प्रा.केतन जाधव, अनंतराव माने, सिताराम माने, आकाश राऊत, प्रविण माने, प्रा.रामदास कदम, प्रा.प्रकाश बोधे, नागरिक, वसंतदादा पाटील महाविद्यालयाचे शिक्षक, कर्मचारी विद्यार्थी, विद्यार्थीनी बहुसंख्येने उपस्थित होते.
यावेळी डॉ नरेंद्र दाभोलकर यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. सुत्रसंचालन चंद्रहार माने व दिपक साबळे यांनी केले. प्रास्ताविक मोहसीन शेख यांनी केले.
पाहुण्यांचा परिचय प्रा.हिंदूराव पवार यांनी करून दिला. मान्यवरांचे स्वागत शंकरराव कणसे यांनी केले.
श्रध्दा ठेवावी पण अंधश्रद्धा ठेवू नये: प्रा.डॉ. नितिन शिंदे
RELATED ARTICLES