वाईसाठी साडेचार कोटी आले; मदन भोसले यांचे प्रयत्न फलद्रुप

वाई: मिरवण्यासाठी, स्वत:ची टिमकी वाजवण्यासाठी किंवा कोणी सत्कार करण्यासाठी मदनदादा भोसले यांचे काम नसते. त्यांनी जे बोलून दाखवलं ते करुनच दाखवलं. अनेकांना जे स्वप्नवत वाटत होतं ते त्यांनी प्रत्यक्ष करुन दाखवलं. त्यांच्या याच कर्तबगारीतून वाई शहराला मंजूर झालेल्या निधीतील साडेचार कोटी रुपयांचा निधी वर्गही झाला आहे. प्रगतीची ही प्रक्रिया वाईशहरासह संपूर्ण वाई, खंडाळा, महाबळेश्‍वर मतदारसंघात सुरु झाली आहे, असे प्रतिपादन वाईच्या नगराध्यक्षा डॉ. प्रतिभा शिंदे यांनी केले.
मुख्यमंत्री देवेंंद्र फडणवीस यांची भेट घेवून मदन भोसले यांनी वाई शहरासाठी तब्बल 59 कोटींचा निधी मंजुर करुन घेतला आहे. मदन भोसले यांनी वाईशहरासह संपूर्ण वाई, खंडाळा, महाबळेश्‍वर विधानसभा मतदारसंघातील अनेक कामांसाठी कोठ्यवधी रुपयांच्या निधी मंजूर केला आहे. या मंजूर निधीतील वाई शहरासाठी साडेचार कोटींचा निधी उपलब्ध झाल्याबद्दल नगराध्यक्षा डॉ. शिंदे यांनी मदन भोसले यांचे आभार मानले. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. डॉ. शिंदे म्हणाल्या, वाई शहरातील नगरपरिषेदेच्या शाळा क्र. 4 साठी 3 कोटी व फुलेनगर येथील किवरा ओढा पुलासाठी दिड कोटी रुपये निधी प्रत्यक्षपणे वितरीत झाला आहे.
या निधीच्या वितरणाचे आदेश नगरविकास विभागाकडून संबंधितांना रवाना झाले आहेत. दि. 20 ऑगस्ट रोजी महाराष्ट्राच्या राज्यपालांच्या आदेशाने व नावाने याबाबतचे आदेश नगरपरिषद प्रशासनाचे आयुक्त, विभागीय आयुक्त, सातारच्या जिल्हाधिकारी यांच्यासह संबंधितांना रवाना करण्यात आले असून त्याची प्रत नगरपरिषदेलाही प्राप्त झाली आहे. वाई शहरातील तमाम नागरिकांच्यावतीने ही अत्यंत आनंदाची आणि समाधानाची गोष्ट आहे. मदनदादा भोसले यांच्या कार्यक्षमतेची, तत्परतेची आणि हातोटीची चुणूक या घटनेतून स्पष्ट झाली आहे. कोणी कितीही देव पाण्यात बुडवून ठेवले तरी मदनदादांच्या याच कार्यक्षमतेच्या जोरावर उर्वरीत निधीही प्राप्त होणार आहे, असाही विश्‍वास नगराध्यक्षांनी व्यक्त केला.
यावेळी किसन वीर कारखान्याचे संचालक रतनसिंह शिंदे, सयाजी पिसाळ, अरविंर कोरडे, मधुकर शिंदे, माजी संचालक रोहिदास पिसाळ, भाजपाचे वाई शहराध्यक्ष अजित वनारसे, सरचिटणीस विजय ढेकाणे, नगरसेवक सतिश वैराट, महेंद्र धनवे, सुनिता चक्के, अमजद इनामदार, ईशान भोसले, संतोष जमदाडे, अ‍ॅड. दिनेश धुमाळ, नाना सूर्यवंशी, विशाल गुजर, केदार काटे, अश्‍विन भिंताडे, सोन्या शिंदे आदी उपस्थित होते.