पै. विलास देशमुख यांना ऑलिम्पिकवीर पै.खाशाबा जाधव क्रीडा पुरस्कार प्रदान

वाई: मान अभिमान विकास फौंडेशन महाराष्ट्र या संस्थेने आयोजित केलेल्या आणि नॅशनलस्पोर्ट ऑर्गनायजेशन कमिटी यांच्या मान्यतेने रविवार दि.10 मार्च रोजी भोसरी पुणे येथे झालेल्या ऑलीम्पिकविर पै.खाशाबा जाधव राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला.
त्यामध्ये पैलवान ग्रुप महाराष्ट्रचे संस्थापक अध्यक्ष- पै.विलास देशमुख यांना त्यांच्या सेनादलात असतानाच्या कुस्तीक्षेत्रातील आंतराष्ट्रीय पातळीवर केलेल्या उल्लेखनीय कामगिरी बद्दल ऑलीम्पिकविरपै.खाशाबा जाधवक्रीडा गौरव पुरस्कारदेऊन सन्मानित केले या कार्यक्रमात अर्जुन पुरस्कार विजेतेपै.काकासाहेब पवार यांना जीवनगौरव पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
युवा राष्ट्रकुल विजेतापै.रणजित नलावडेयांना महाराष्ट्र गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले, सर्व पुरस्कार सिने अभिनेते समृद्धी जाधव व मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले.
यावेळी पुणे जिल्ह्यातील युवकांचे आधारस्तंभ मा.शामभाऊ शिंदे,मा.अजय साळुंखे साहेब, प्रा.अमोल साठे आणिपिंपरी चिंचवडमधील क्रीडा, शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
सिनेअभिनेते समृद्धी जाधव म्हणाले, कुस्ती क्षेत्रात ओलम्पिक मध्ये देशाचे उंच शिखरावर नेणारे ऑलीम्पिकविर पै.खाशाबा जाधव या नावाने देण्यात येणार्‍या पुरस्कार सोहळ्यात पुरस्कार प्रदान करण्याचा मान मला मिळाल्याने अभिमानाने छाती भरून येत आहे.
तरी महराष्ट्रातील कुस्तीविरांनी कुस्ती क्षेत्रात ऑलीम्पिकविर पै.खाशाबा जाधव यांचे नाव अजरामर ठेवण्यासाठी भरीव कार्य करावे तीच खरी आदरांजली ठरेल. तसेच आजच्या तरुणांनी नियमित व्यायाम करून निरोगी पिढी निर्माण करण्यासाठी सहकार्य करावे.