दौलतनगरच्या ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळयाची दशकपुर्ती उत्साहात

सातारा : महाराष्ट्राचे पोलादी पुरुष,पाटण तालुक्याचे दैवत लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या 36 व्या पुण्यतिथीनिमित्त पाटण तालुक्यातील दौलतनगर येथे प्रतिवर्षी साजर्‍या होणार्‍या तीनदिवसीय श्री.ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळयाची यंदाच्या वर्षी मोठया उत्साहात दशकपुर्ती साजरी करण्यात आली.पारायण सोहळयाच्या शेवठच्या दिवशी लोकनेते बाळासाहेब देसाई यांचा 36 वा पुण्यस्मरण सोहळा मोठया उत्साहात पार पडला.पुण्यतिथीदिवशी तीन दिवसीय श्री.ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणाच्या निमित्ताने भव्य दिव्य दिंडी सोहळयाने श्री.ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज व लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे प्रतिमांची भव्य मिरवणूक काढण्यात येवून कारखाना कार्यस्थळावरील लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे पुर्णाकृती पुतळयावर आ.शंभूराज देसाई यांच्या हस्ते ध्वजारोहण व पुतळयावर पुष्पवृष्टी करुन पारायण सोहळयातील भाविक भक्तांच्या उपस्थितीत लोकनेते बाळासाहेब देसाई यांना विन्रम अभिवादन करण्यात आले.भव्यदिव्य दिंडी व रिंगण सोहळयाने दौलतनगरला सकाळपासून भक्तीमय वातावरण होते.
दौलतनगर ता.पाटण येथील दौलत औद्योगिक प्रशिक्षण केंद्राच्या भव्य प्रांगणात लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे 36 व्या पुण्यतिथीनिमित्त गत नऊ वर्षापासून सुरु असलेल्या श्री.ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळयाचे यंदाचे दहावे वर्ष होते.या पारायण सोहळयामध्ये 377 महिला तसेच 367 पुरुषांसह 744 वाचक सहभागी झाले होते.तसेच तालुक्या बाहेरीलही भाविक भक्त या सोहळयामध्ये मोठया संख्येने सहभागी होते.तर वारकरी साप्रंदयातील विविध मान्यवरांची प्रवचने,कीर्तने तसेच गावोगावच्या भजनांचे जागराचे कार्यक्रम यानिमित्ताने आयोजीत करण्यात आले होते.या संपुर्ण पारायण सोहळयामध्ये आ. शंभूराज देसाई, श्रीमती विजयादेवी देसाई मॉसाहेब,रविराज देसाई, सौ.स्मितादेवी देसाई, सौ.अस्मितादेवी देसाई यशराज देसाई, ईश्वरी देसाई, जयराज देसाई, आदित्यराज देसाई,प्रकाश देसाई यांचा विशेष सहभाग होता.तर ह.भ.प.जयवंतराव शेलार महाराज, ह.भ.प.अनिल पाटील महाराज, ह.भ.प.जगन्नाथ ठोंबरे महाराज यांच्यासह त्यांचे सहकारी यांचाही सहभाग होता.
तीन दिवसीय श्री.ग्रंथराज ज्ञानेश्वर ग्रंथाचे वाचन पुर्ण झालेनंतर लोकनेते यांचे पुण्यतिथी दिवशी फुलाने सजविलेल्या पालखीत श्री.ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज व लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या प्रतिमा ठेवून टाळ मृदुंगाच्या तालावर,डोक्यावर कलश,तुळशी वृंदावन घेतलेल्या सुहासिनी ढोल वाद्यांसमवेत श्री.विठ्ठल नामाचा तसेच ज्ञानोबा माऊली ज्ञानराज माऊली यांचे गजरात आणि लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या जयघोषात माऊलीच्या मंडपातून निघालेल्या भव्य दिंडीला लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे मेघडंबरी येथून सुरुवात करण्यात आली.पारायण सोहळयाची भव्य दिंडी ही कारखाना कार्यस्थळावरील लोकनेते यांचे पुर्णाकृती पुतळयासमोर आलेनंतर आमदार शंभूराज देसाई यांचे हस्ते पुतळयासमोर प्रथमत: ध्वजारोहण करण्यात येवून लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या पुतळयावर पुष्पवृष्टी करण्यात आली तसेच 21 तोफांची सलामी देण्यात आली तर पुतळयासमोर अभंग व आरती करुन लोकनेते यांचा 36 वा पुण्यतिथी सोहळा साजरा करण्यात आला. त्यानंतर पुतळ्यासमोर भव्य असा रंगलेला रिंगण सोहळा हे दृष्य अत्यंत मनमोहक होते. चौथ्या दिवशी काल्याच्या किर्तनाने उपस्थित सर्व भाविक भक्तांना महाप्रसाद देवून या अखंड हरीनाम भव्य सोहळ्याची सांगता करण्यात आली. दरम्यान या पारायण सोहळयामध्ये सलग 10 वर्षे वाचक म्हणून सहभागी झालेल्या एकूण 30 भाविकांचा व वाचक महिलांचा यथोचित असा सत्कार करण्यात आला. पुण्यतिथी दिवशी दौलतनगरला प्रती पंढरपुर अवतरले होते. गत नऊ वर्षापासून ह.भ.प.पुडंलिक महाराज कापसे आळंदीकर हे या पारायण सोहळ्यामध्ये व्यासपीठ चालक म्हणून आपली सेवा बजावीत आहेत.
यंदाचा सोहळयातही त्यांनी व्यासपीठ चालक म्हणून सेवा बजावली तर हा पारायण सोहळा यशस्वी करण्याकरीता आमदार शंभूराज देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली ह.भ.प.जयवंतराव शेलार महाराज,ह.भ.प.अनिल पाटील महाराज,ह.भ.प.जगन्नाथ ठोंबरे महाराज यांच्यासह त्यांचे सहकारी यांचेसोबत लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समूहातील अधिकारी कर्मचारी यांनी कष्ट घेतले.
या सर्वांचे आभार आ.शंभूराज देसाईंनी मानले.या सोहळ्यास लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समूहातील सर्व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते यांची मोठया संख्येने उपस्थिती होती.
रिंगणसोहळ्याने भाविक भक्त भारावले.
लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे पुण्यतिथी निमित्ताने लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे पुतळ्यास अभिवादन केलेनंतर पुतळ्यासमोर प्रतिवर्षी साजरा करण्यात येणारा रिंगण सोहळा हा या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण असते, या रिंगण सोहळ्यामध्ये अबाल वृध्दासंह लहानथोर सर्वजण मोठ्या संख्येने सहभागी होत असतात. पंढरपुरच्या वारीमध्ये ज्याप्रमाणे रिंगण सोहळा आयोजित केला जातो. त्याचप्रमाणे या ठिकाणीही रिंगण सोहळा आयोजित करण्यात येतो याचे नेतृत्व स्वत: आमदार शंभूराज देसाई करतात. यंदाच्या रिंगण सोहळ्यास भाविक भक्तांची मोठी गर्दी होती. हा रिंगण सोहळा पाहून उपस्थित भाविक भक्त भारावून गेले.