वाढती महागाई विरोधात पाटण तालुका महिला राष्ट्रवादी आघाडीचे तहसीलदारांना निवेदन

पाटण:- सतत वाढत जात असलेल्या महागाई मुळे सर्वसामान्य कुटुंबातील नागरिकांना जगणं मुश्किल झाले आहे. महागाई कमी करण्यास हे सरकार अपयशी ठरले आहे. पैट्रोल, डिझेल, गैस यांचे दर गगनाला भिडले आहेत. अशा परिस्थितीत सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे लोकांची होणारी पिळवणूक थांबवावी तसेच मुली – महिलांच्या बाबतीत उधाळलेली मुक्ता फळ बाबत राम कदम यांचा निषेध करत पाटण तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस महिला आघाडीच्या वतीने पाटण तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले आहे.

या निवेदनात पुढे म्हणले आहे. सद्या वाढत असलेल्या महागाई, पैट्रोल, डिझेल, गैस दरवाढीमुळे देशातील सर्व सामान्य कुटुंबांचे हाल होत आहेत. व आर्थिक पिळवणूक होत आहे.सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे सर्व सामान्य जनता महागाईमुळे भरडली जात आहे. तसेच भाजप प्रवक्ता राम कदम यांनी मुली – महिलांच्या बाबतीत उधाळलेली मुक्ता फळ याचा जाहीर निषेध करून सरकारच्या विरोधात पाटण तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला आघाडीने पाटण तहसीलदार यांना निवेदन दिले आहे. या निवेदनावर पाटण तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस युवती अध्यक्षा रोहिणी पाटील, माजी पंचायत समिती सदस्य शोभा कदम, मिलन सय्यद, जयश्री लुगडे, छाया बनसोडे, मनिषा बनसोडे, सुनिता कदम, शोभा पडवळ, नंदा पवार, अनिता कदम आदी राष्ट्रवादी महिला कार्यकर्त्यां यांच्या सह्या आहेत.