संदिप ञिंबके राज्य आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित

मायणी :(सतीश डोंगरे) मायणी भाग शिक्षण प्रसारक मंडळ, मायणीचे भुतेश्वर विद्यामंदिर अंबवडे (ता.खटाव) येथील शिक्षक संदीप त्रिंबके यांना संकेत कला,क्रीडा प्रतिष्ठानच्या वतीने (पुणे) राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला.
पुणे येथील संकेत कला क्रीडा प्रतिष्ठानच्यावतीने शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात उत्कृष्ट काम करणा व्यक्तींना पुरस्कार देण्यात येतो.
संदीप त्रिंबके यांनी नवनवीन उपक्रम राबवून शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी सातत्य ठेवून जिल्हा व राज्य स्तरावर आपल्या निबंध लेखनाची ,नवोपक्रमाची , कृतिसंशोधनाची छाप टाकली आहे. विज्ञान प्रदर्शना मध्ये सहभागी होऊन यश मिळवणारे तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध स्पर्धामध्ये विद्यार्थ्यांना सहभागी होण्यासाठी आजपर्यंत महत्त्वाचे योगदान दिले आहे.
लोकशाहिर आण्णा भाऊ साठे नाट्यगृह , पुणे येथे संपन्न झालेल्या कार्यक्रमात समारंभाचे अध्यक्ष वेदाचार्य डाॅ. भागवत गुरूजी ( संस्थापक अध्यक्ष गुरूकुल विद्याभवन )यांच्या हस्ते संदीप त्रिंबके यांना संन्मानपञ व स्मृती चिन्ह देऊन संकेत राज्य आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या सौ.दिपाली शेळके (अध्यक्ष अखिल भारतीय नाट्य परिषद ता.शिरूर ) प्रतिष्ठानचे अध्यक्ष मा.विश्वासराव पवार, मा.पठाण साहेब (मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश) अभिनेता सुभाष यादव ,अभिनेञी अमृता फडके, राजेश्वरी खरात , मिस एशिया सुंदरी अमृता मोरे ,गायक जनार्दन खंडाळे ,मा.प्राचार्य डाॅ. सतिश गवळी उपस्थित होते.
या यशाबद्दल संस्थेचे चेअरमन सुरेंद्र गुदगे, सचिव सुधाकर, कुबेर सर,सर्व संचालक, मुख्याध्यापक, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले.