शिवनेरीच्या पायथ्याशी दि.13 रोजी होणार शिवभक्तीचा जागर

वडूज : उत्तरप्रदेश मराठी समाज मंडळाच्या वतीने शिवजयंती उत्सवानिमित्त महाराष्ट्रातील किल्ले शिवनेरी (ता. जुन्नर जि. पुणे) ते लखनऊ (ऊत्तर प्रदेश) अशी शिवज्योत यात्रा काढण्यात येणार आहे. या मोटारसायक बाईक यात्रेच्या शुभारंभानिमित्त मंगळवार दि. 13 रोजी दुपारी 1 ते 4 या वेळेत शिवनेरी किल्याच्या पायथ्यानजीक असणार्‍या महालक्ष्मी कार्यालयात मान्यवरांच्या उपस्थितीत शिवभक्तीचा जागर होणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट वंशज खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होणार आहे.
या कार्यक्रमासाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, सहकारमंत्री सुभाषबापू देशमुख, पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर, जलसंपदा मंत्री विजयबापू शिवतारे, मंत्री सदाभाऊ खोत, दिलीप कांबळे, खा. शिवाजीराव आढाळराव-पाटील, खा. सुप्रियाताई सुळे, खा. धनंजय महाडीक, आ. बाळासाहेब पाटील, आ. मोहनराव कदम, आ. जयकुमार गोरे, आ. अनिलभाऊ बाबर, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्‍वजित कदम, भाजपाचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावस्कर, विश्‍वासराव नांगरे-पाटील, आ. शरद सोनवणे, डॉ. दिलीपराव येळगांवकर, संग्रामभाऊ देशमुख, सदाशिव पाटील, प्रा. नितीन बानुगडे-पाटील, गोपीचंद पडळकर, सुहास बाबर, सत्यशिल शेरकर, संदिप मांडवे, विलास शिंदे, राजेंद्राआण्णा देशमुख, पै. चंद्रहार पाटील, वैभव पाटील, ललिता चव्हाण, आशाताई बुचके आदिंसह पश्‍चिम महाराष्ट्रातील मान्यवर पदाधिकार्‍यांना निमंत्रित करण्यात आले आहे. मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी उत्तरप्रदेश मराठी समाजाचे संस्थापक उमेशआण्णा पाटील, उपाध्यक्ष विश्‍वनाथ देवकर, मिडीया प्रभारी पांडुरंग राऊत, कोषाध्यक्ष गजानन माने, संघटनमंत्री संतोष पाटील, महामंत्री प्रदिपशेठ गायकवाड, आनंदराव देवकर, मनोहर फडतरे आदिंसह संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते प्रयत्नशील आहेत. वरील कार्यकत्यांनी मान्यवर पदाधिकारी व पश्‍चिम महाराष्ट्रातील बहुतांशी राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांना समक्ष भेटून कार्यक्रमास येण्याचे निमंत्रण दिले आहे.
19 रोजी लखनऊत महोत्सव
शिवनेरीहून लखनऊमध्ये गेलेल्या बाईकचे दि. 19 रोजी भव्य स्वागत होणार आहे. हा स्वागत समारंभ व शिवजयंतीच्या मुख्य कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राज्यपाल राम नाईक, उपमुख्यमंत्री डॉ. दिनेश शर्मा, जेष्ठ नेते लालजी टंडन आदिंसह राज्यमंत्रीमंडळातील मान्यवरांना निमंत्रित करण्यात आले आहे. यानिमित्ताने संपुर्ण सप्ताहभर शिवजयंती महोत्सव साजरा केला जाणार आहे. या महोत्सवात पोवाडा, शौर्यगिते, ऐतिहासिक शस्त्रांचे प्रदर्शन असे कार्यक्रम होणार आहेत. या कार्यक्रमामुळे उत्तरप्रदेशातही छत्रपती शिवरायांच्या कार्याच्या महतीला उजाळा मिळणार आहे.