विद्यार्थ्यांनी अभ्यासाएवढेच खेळाला प्राधान्य द्यावे: नगरसेवक धनंजय जांभळे
सातारा : खेळाने मन, मनगट, मेंदू याचा विकास होतो. शरिर निरोगी बनते. निरोगी शरिरात निरोगी मन वास्तव्य करते, असे प्रतिपादन सातारा नगरपरिषदेचे नगरसेवक धनजंय जांभळे यांनी केले ते क्रिडा सप्ताहाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.
यावेळी व्यासपिठावर संस्था प्रतिनिधी चरणीकांत भोसले, संस्थेचे जनसंपर्क अधिकारी चंद्रकांत सोनावणे, प्रभारी मुख्याध्यापिका रजनी नायर उपस्थित होते.
धनजंय जांभळे पुढे म्हणाले, ङ्गविदयार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच खेळाला प्राधान्य दिले पाहिजे. खेळामुळे शरिराचा सर्वांगीण विकास होतो. खेळ म्हटले की, हार-जीत आली परंतू, जरी हार झाली तरी विदयार्थ्यांनी निराश न होता. पुन्हा जिंकण्यासाठी खेळले पाहिजे.फ प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विजयी विदयार्थ्यांचा मेडल, प्रमाणपत्र देवून सत्कार करण्यात आला. यावेळी विदयार्थ्यांनी विविध प्रकारची मनोरे, प्रात्यक्षिके सादर केली. धावणे, खो-खो, कबड्डी, बास्केटबॉल आदि खेळांचा समावेश होता.
प्रमुख पाहुण्यांचा सत्कार श्रीमती रजनी नायर यांनी शाल, बुके देवून केला. यावेळी सर्व शिक्षक, कर्मचारी, विदयार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.
यशोदाच्या साधना इंग्लिश मिडीयम स्कूलचा क्रिडा सप्ताह उत्साहात
RELATED ARTICLES