विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रमासाठी सज्ज रहावे : प्रभाकर देशमुख  

औंध : विद्यार्थ्यांनी निश्चित ध्येय डोळयासमोर ठेवून ज्ञानार्जन केल्यास खटावमाण तालुक्यातील विद्यार्थ्यांचा स्पर्धा परिक्षेत वेगळा ठसा उमटेल त्यासाठी  विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रमासाठी सज्ज रहावे असे आवाहन सेवानिवृत्त विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख यांनी केले.
येथील औंध शिक्षण मंडळाच्या सर्व विद्या शाखांच्या वार्षिक पारितोषिक वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी चेअरमन गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी, चारूशीलाराजे, हर्षिताराजे,  बख्तावर अंटी,पल्लू मामा, कविता वर्मा,सभापती शिवाजी सर्वगोड, संदिप मांडवे,आब्बास आतार, हणमंत शिंदे,शंकरराव खैरमोडे, राजेंद्र माने, वसंत देशमुख, दिपक नलवडे
प्रदिप कणसे, दिपक कर्पे  आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते. देशमुख पुढे म्हणाले, शिक्षण क्षेत्रात फार मोठे बदल होत असून  येणार्‍या आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी फक्त पुस्तकी ज्ञान पुरेसे ठरणार नाही. त्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांच्या अंगी कौशल्ये असणे गरजेचे आहे. स्पर्धा परीक्षा, विविध खेळांमध्ये ही संधी असून  निश्चित ध्येय डोळयासमोर ठेवून शिक्षण घेणे ही काळाची गरज बनली आहे.
यावेळी इयत्ता दहावी,बारावी तसेच पदवी शिक्षण घेत असलेल्या, शिष्यवृत्ती प्राप्त, विविध खेळांमध्ये यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थी, खेळाडूंचा सन्मान पारितोषिके देऊन करण्यात आला.यावेळी हणमंतराव शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले.
प्रास्ताविक प्रदिप कणसे यांनी सूत्रसंचालन प्रा.दिपक कर्पे ,आभार प्रा.संजय निकम यांनी मानले. कार्यक्रमास प्राचार्यसंभाजीबामणे,एस.डी.दौंड,व्ही.एस.मोरे,एस.बी.कुंभार,एस.बी.घाडगे,एस.व्ही.कुंभार, सी.एस.साळुंखे ,शिक्षक, प्राध्यापक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.