साताऱ्यात कोरोना संकटातही चार जुगार अड्डयावर छापे ; स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी

सातारा दि : सातारा जिल्ह्यात कोरोना बधितांची संख्या २७७ वर पोहोचली असून दक्षतेने उपाय योजना राबविण्यात येत आहेत. अशा तच सातारा शहतील उपनगरात सुरू असलेल्या चार जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी छापा टाकला. पाच जुगाऱ्यांना ताब्यात घेतले. असून त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे.

 

या जुगार अड्ड्यावर नेहमी जुगार खेळणारे अमोल आनंद वासुदेव (रा. मंगळवार पेठ, सातारा), शरद शामराव साळुंखे (रा. शाहूनगर), निलेश प्रकाश गायकवाड (रा. शनिवार पेठ), मकरंद प्रभाकर कुलकर्णी (रा. यादोगोपाळ पेठ), अरजून शिवालाल राठोड (रा. लक्ष्मीटेकडी, सदरबझार) यांना ताब्यात घेत त्यांच्याकडून सात हजार रुपये रोख व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.

 

सातारा शहर व परिसरात सातारा शहर व शाहूपुरी पोलीस ठाण्यांच्या हद्दीत गेल्या काही दिवसांपासून अवैध धंद्यांनी उच्छाद मांडला होता. आज ही मोळाचा ओढ्या नजिक झोपडपट्टी परिसरात जुगार सुरू आहे.  केवळ करोना बंदोबस्ताला पोलीस गुंतल्यामुळे अवैध धंदे बोकाळल्याने जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी स्थानिक गुन्हे शाखेला कारवाईचे आदेश दिले होते. त्यानंतर शहरातील गुरुवार परज, जुना मोटार स्टॅंड परिसर, समर्थ मंदीर परिसरात काही लोक जुगार अड्डा चालवत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांना मिळाली होती.

 

पो नि पाटील यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंदसिंग साबळे यांना कारवाईच्या सुचना केल्या. त्यानुसार त्याठिकाणी सापळा ल आलेल्या वरील संशयितांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता जुगार अड्डा चालवत असल्याची कबुली त्यांनी दिली. संशयितांना पुढील कारवाईसाठी सातारा शहर व शाहूपुरी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.सदर आरोपींना अटक केली असून त्यांची बाजू मांडण्यासाठी साताऱ्यातील  काही वकील मंडळी पुढे आली आहेत.यातील काही जण  सातारा शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्याबाबत नेहमीच चिंता व्यक्त करतात. अशी परिसरात चर्चा होत आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर अधीक्षक धीरज पाटील, पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंदसिंग साबळे, हवालदार उत्तम दबडे, संतोष पवार, मोहन नाचन, शरद बेबले, नितीन भोसले, प्रवीण फडतरे, राजकुमार ननावरे, गणेश कापरे, केतन शिंदे, संजय जाधव यांनी केली. त्यांचे मान्यवरांनी तसेच युवक मंडळांनी आभार मानले आहेत. जागा मालकांवर कारवाई व्हावी अशी मागणी यानिमित्त पुढे आली आहे.