उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक ही ग्रेट प्लेस टू वर्क® इन्स्टिट्यूटच्या ‘बेस्ट लार्ज वर्कप्लेसेस इन एशिया 2020’ मध्ये पाचव्या क्रमांकावर

 

मुंबई : उज्जीवन स्मॉल फायनान्स बँकेने ग्रेट प्लेस टू वर्क® इन्स्टिट्यूटच्या ‘बेस्ट लार्ज वर्कप्लेसेस इन एशिया 2020’ यादीत पाचवा क्रमांक पटकावला आहे. 2019 मध्ये उज्जीवन एसएफएबी बेस्ट लार्ज वर्कप्लेसेस इन एशियामध्ये 16 व्या क्रमांकावर होती. ग्रेट प्लेस टू वर्क®च्या सर्वोत्कृष्ट कंपन्यांच्या यादीत उज्जीवन एसएफबीने गेले दशकभर सातत्याने स्थान पटकावले आहे.
हे रँकिंग दोन निकषांवर आधारले आहे. यात ग्रेट प्लेस टू वर्क®च्या सर्वेक्षणात कर्मचाऱ्यांनी दिलेल्या प्रतिक्रियांच्या आधारे ट्रस्ट इंडेक्स© स्कोअर दिला जातो आणि उज्जीवन एसएफबीमधील 15 सर्वोत्कृष्ट पद्धतींवरील माहितीपूर्ण लेखांवर कल्चर ऑडिट© स्कोअर आधारित असतो.
या निकालांसंदर्भात उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक लि. चे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. नितिन चुघ म्हणाले, “आमच्या कार्यपद्धतींमध्ये आम्ही कर्मचाऱ्यांना नेहमीच केंद्रस्थानी ठेवले आहे. आमच्या कर्मचाऱ्यांना व्यावसायिक जीवनात प्रगती करता यावी यासाठी त्यांच्या प्रतिभांना जोखून प्रोत्साहन देण्यावर आम्ही सातत्याने भर देत असतो. हा सन्मान म्हणजे आमच्या कार्यालयांमध्ये आम्ही जपत असलेल्या संघभावना आणि सद्भावनेचा सन्मान आहे आणि आमच्याकडील अनुकूल वातावरण कर्मचाऱ्यांना आवडते, हे सुद्धा यातून स्पष्ट होते.”
ग्रेट प्लेस टू वर्क® इन्स्टिट्यूटच्या प्रॅक्टिस हेड प्रीती मल्होत्रा म्हणाल्या, “कामाची उत्तम जागा कोणत्याही परिस्थितीत कर्मचाऱ्यांना प्रयोगशील राहण्यासाठी, शिकण्यासाठी आणि यशस्वी होण्यासाठी स्वातंत्र्य आणि अनुकूल वातावरण देते. कर्मचाऱ्यांनी आपल्या नेत्यांवर विश्वास टाकणे, कामाप्रती आनंदी असणे आणि त्यांच्या योगदानाचे मूल्य समजून घेणेही महत्त्वाचे असते. उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक या बाबतीत त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी ओळखली जाते आणि आदर, विश्वास आणि न्याय पद्धतींना प्रोत्साहन देणारी ही संसथा आहे.”
कोविड-19 जगभरात लोकांचे आयुष्य आणि व्यवसाय पद्धतींवर परिणाम करत असताना हे रँकिंग प्रसिद्ध झाले आहे. आपल्या नावावरील विश्वास जपणारी आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य देणारी उज्जीवन एसएफबी आपल्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी शक्य ते सर्व प्रयत्न करत आहे. ही समस्या भारतात आल्यापासून उज्जीवन उसएफबी फोन, एसएमएस आणि ईमेलच्या माध्यमातून आपल्या कर्मचाऱ्यांना कोविड-19 ची माहिती देत आहे. लीडरशीप टीम देशभरातल्या कर्मचाऱ्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संवाद साधत उज्जीवन एसएफबी कुटुंब या संकटाला ठामपणे तोंड देत आपले कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबाचे हित जपण्यास प्रयत्नशील आहे, हे सांगत आहे. कर्मचाऱ्यांना या काळात विरंगुळा म्हणून त्यांच्यासाठीच्या अॅपवर विविध आकर्षक कोडी, स्पर्धांसह ऑनलाइन लर्निंग मोड्युल्सही देण्यात आली आहेत.
ग्रेट प्लेस टू वर्क®तर्फे मागील 25 वर्षांपासून कामाच्या उत्कृष्ट जागांच्या वैशिष्ट्यांसंदर्भात संशोधनाला सुरुवात करण्यात आली. कामाच्या उत्कृष्ट ठिकाणांमधील संस्कृतीला जोखणे आणि त्यांचे प्रमाणन यासंदर्भात या संस्थेला गोल्ड स्टँडर्ड मानले जाते. प्रत्येक संस्था उत्कृष्ट कामाची जागा बनू शकते, यावर त्यांचा विश्वास आहे आणि या कामात संस्थांना साह्य करणे हे त्यांचे उद्दिष्ट आहे. ग्रेट प्लेस टू वर्क®चे अस्तित्व असलेल्या आशिया प्रांतातील आठ देशांमधील 2.2 मिलीयनहून अधिक कर्मचाऱ्यांनी यात भाग घेतला. ग्रेट प्लेस टू वर्क® दरवर्षी जगभरातील 10000 हून अधिक संस्थांसोबत जोडली जाते आणि त्यातून अत्यंत विश्वासाचे म्हणजेच हाय ट्रस्ट, हाय परफॉर्मन्स कल्चर™ तयार करण्यात आणि ते राखण्यात तसेच ग्रेट प्लेस टू वर्क-सर्टिफाइड™ होण्यासाठी काम करते.
उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक लिमिटेडबद्दल
उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड ही उज्जीवन फायनान्शिअल सर्विसेस लि.च्या पूर्ण मालकीची उपकंपनी आहे. उज्जीवन फायनान्शिअल सर्विसेस लि.ने अधिग्रहण केल्यानंतर संपूर्ण व्यवसाय हस्तांतरित करून 1 फेब्रुवारी 2017 पासून या बँकेने स्मॉल फायनान्स बँक म्हणून आपले कामकाज सुरू केले. रिझर्व्ह बँकेने बँकिंग रेग्युलेशन कायदा, 1949 च्या कलम 22 (1) अंतर्गत या बँकेला भारतात स्मॉल फायनान्स बँक म्हणून काम करण्याचा परवाना दिला. उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक लि.चा रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अॅक्ट, 1934 च्या सेकंड शेड्युलमध्ये समावेश करण्यात आला आहे.