सातारा : उरमोडी धरणप्रकल्पातील वेणेखोल गावातील खोतदारांचे पुर्नवसन म्हसवड ता. माण येथे करण्याचा निर्णय झाला आहे. मात्र अद्यापही पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लागला नाही. जिल्हा प्रशासनाने तातडीने वेणेखोलमधील प्रकल्पगस्तांचे गावठाण मंजूर करुन त्यांना प्लॉट वाटप करावे, अशी आकमक भुमिका आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी घेतली. अप्पर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांनी याबाबत सकारात्मक भुमिका घेवून 65 टक्के कपातीच्या पावत्या असणार्या खातेदारांना 10 दिवसांत प्लॉट वाटप करा, अशा सुचना उपस्थित अधिकार्यांना केल्याने येत्या 10 दिवसांत प्रकल्पगस्तांना प्लॉट वाटप सुरु केले जाणार आहे.
अप्पर जिल्हाधिकरी शिंदे यांच्या दालनात वेणेखोल प्रकल्पगस्तांचे पुर्नवसन व इतर प्रश्नांसदर्भात बैठक झाली. या बैठकीस आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राजू भोसले, तहसिलदार जगदीश निंबाळकर, उरमोडी प्रकल्पाचे अधिक्षक अभियंता विजय घोगरे, कार्यकारी अभियंता म. शि. धुळे, सहायक कार्यकारी अभियंता स्वप्निल सपकाळ यांच्यासह संबंधीत सर्व अधिकारी, वेणेखोलचे सरपंच नारायण सपकाळ, बाळकृष्ण सपकाळ, बाळासाहेब सपकाळ, अमोल सपकाळ, बजरंग सपकाळ आणि सर्व प्रकल्पगस्त उपस्थित होते.
बैठकीत 65 टक्के कपातीच्या पावत्या असणार्या खातेदारांना वारंवार सातबारा, फेरफार आदी कागदपत्रे काढण्यासाठी सांगून त्यांना नाहक त्रास दिला जात असून हे प्रकार थांबवावेत. तसेच तातडीने गावठाण, प्लॉट वाटप करावे. 65 टक्के कपातीचे पैसे भरणा न केल्याने अपात्र दाखवलेल्या 35 खातेदारांना तत्काळ पात्र करुन घ्यावे. तसेच खातेदारांना गेल्या 20 वर्षांचे व्याज मिळावे आणि जुन्या संकलनाप्रमाणे खातेदारांना प्रत्येकी 2 एकर जमीन देण्यात यावी आदी मागण्यांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. कागदपत्रांसाठी खातेदारांना वेठीस न धरता 65 टक्के कपातीच्या पावत्यांनुसार त्यांना तत्काळ पुनर्वनस जागी प्लॉट देण्यात यावेत आणि सर्व मागण्यांची त्वरीत पुर्तता करावी, अशा सुचना आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी बैठकीत केल्या. यावर अप्पर जिल्हाधिकारी शिंदे यांनी सकारत्मक निर्णय घेत उपस्थित अधिकार्यांना सर्व खातेदारांना येत्या 10 दिवसांत प्लॉट वाटप करण्याच्या सुचना केल्या. तसेच 20 वर्षांचे व्याज संबंधीत खातेदारांच्या खात्यावर वर्ग करण्याबाबतही त्यांनी अधिकार्यांना सांगितले. आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या पाठपुराव्यामुळे सर्व मागण्या मान्य झाल्याबद्दल प्रकल्पगस्तांनी आ. शिवेंद्रसिंहराजे आणि सर्व अधिकार्यांचे आभार मानले.
वेणेखोलमधील प्रकल्पग्रस्तांना 10 दिवसांत होणार प्लॉट वाटप
RELATED ARTICLES