वाधवान राहणार महाबळेश्वरातच दिवान विला या बंगल्यात ; सर्वांच्या हातावर होम क्वारंटाईन शिक्के

सातारा :- येेेस बॅक घोटाळयातील आरोपी वाधवान बंधु व त्यांचे कुटूंबीयाचां पांचगणी येथील इन्स्टिटयुशनल क्वारंटार्इनचा कालावधी संपुष्टात आल्याने त्यांना पुढील 14 दिवसांसाठी पोलिस बंदोबस्तात महाबळेश्‍वर येथील वाधवान यांच्या मालकिच्या दिवान विला या बंगल्यात होम क्वारंटार्इन करण्यात आले आहे .इन्स्टिटयुशनल क्वारंटार्इनचा कालावधी संपुष्टात आल्या नंतर वाधवान यांचा मुक्कम कोठे असेल या बाबत निर्माण झालेल्या संभ्रमनाटयावर आता पडदा पडला आहे.
जिल्हाबंदी आदेशाचे उल्लंघन करून पुणे जिल्हयातुन सातारा जिल्हयात प्रवेश करणारे वाधवान बंधु व त्यांचे कुटूंबीय व नोकर चाकर असे एकुन 23 जणांवर सातारा जिल्हा प्रशासनाने पांचगणी येथे इन्स्टिटयुशनल क्वारंटार्इन करण्याचा निर्णय घेतला होता. जिल्हा प्रशासनाने या सर्वांवर 188 कलमा नुसार गुन्हा दाखल केला आहे .
दरम्यान वाधवान बंधु हे आर्थिक घोटाळयातील आरोपी असुन ते जामिनावर बाहेर आले असल्याचे समोर आले .तसेच जिल्हा ओलांडण्यासाठी या उदयोगपतींनी गृह विभागाचे प्रधान सचिव अमिताभ गुप्ता यांचे खास पत्र घेतल्याने या प्रकरणाला कलाटणी मिळाली व संपुर्ण राज्याचे लक्ष या प्रकरणाकडे लागले होते.
पांचगणी येथील इन्स्टिटयुशनल क्वारंटार्इनचा कालावधी संपुष्टात आल्यानंतर र्इडी अथवा सीबीआय हे आर्थिक घोटाळयाच्या चौकशीसाठी ताब्यात घेतील त्या मुळे वाधवान बंधु यांचा 23 नंतर पुढील मुक्कम दिल्ली येथे असेल असा कयास लावला जात होता. परंतु तसे काही झालेले दिसत नाही वाधवान बंधु यांना ताब्यात घेण्यासाठी कोणीही पुढे न आल्याने जिल्हा प्रशासनाने वाधवान बंधु व त्यांचे बरोबर असलेल्या सर्वांना महाबळेश्‍वर येथील त्यांच्याच बंगल्यात होम क्वारंटार्इन करण्याचा निर्णय घेतला .त्या नुसार आज पांचगणी येथे त्या सर्वाची वैदयकिय तपासणी करण्यात आली. सर्व कागदपत्रांचे सोपस्कार पुर्ण करून आज सायंकाळी पाच वाजता प्रचंड पोलिस बंदाबस्तात वाधवान कुटुंबियांना महाबळेश्‍वर येथे आणण्यात आले. वाधवान यांच्या सर्व आलिशान गाडया या पुर्वीच जप्त करण्यात आल्या होत्या त्या मुळे आज पांचगणी ते महाबळेश्‍वर या प्रवासासाठी इंडीयन रेड क्रॉस सोसायटी ची बस व सेंट झेवियर्स स्कुलची मिनी बसचा वापर करण्यात आला. या दरम्यान त्यांचे बरोबर प्रांताधिकारी संगिता राजापुरकर ,विभागीय पोलिस अधिकारी अजित टिके, तहसिलदार सुषमा चौधरी पाटील, मुख्याधिकारी अमिता दगडे पाटील, महाबळेश्‍वरचे ेपोलिस निरीक्षक बी ए कोंडुभैरी, पांचगणीचे सहा. पोलिस निरीक्षक सतिश पवार आदी अधिकारी व त्यांचे कर्मचारी असा ताफा होता .
सातारा पोलिसांच्या ताब्यात असलेल्या वाधवान यांच्या वाहनावर सक्त वसुली संचनालय (ईडी) आणि केंद्रीय गुन्हे अन्वेषण (सीबीआय) ने जप्तीची नोटीस अडकवली आहे. आणि या पाच अलिशान गाड्या जप्त केल्या आहेत .
यामध्ये वाधवान कुटुंबीयांच्या दोन रेंज रोवर, तीन फॉर्च्युनर गाड्यांचा समावेश आहे .ed च्या मुंबई कार्यालयाचे सहाय्यक निदेशक राम दीक्षित यांच्या आदेशाने या सर्व गाड्यांवर जप्तीचे आदेश लावण्यात आले आहेत .त्यानुसार ही वाहने सक्त वसुली संचनालय (ईडी) च्या ताब्यात आली आहेत.
सीबीआयने बजावलेल्या अटक वॉरंटची विरोधात न्यायालयातून वाधवान यांनी स्टे ऑर्डर आणली आहे .त्यानुसार येत्या पाच मेपर्यंत सीबीआयला वाधवान यांना अटक करता येणार नाही .याच वेळी सीबीआय न्यायालयाने वाधवान यांना पाच मेपर्यंत सातारा जिल्हा न सोडण्याचे आदेश बजावले आहेत. त्यामुळे आज गुरुवारी वाधवान कुटुंबीयांना जामीन होताच वाधवान कुटूंबातील कपिल वाधवान वय 46, अरूणा वाधवान 68, वनिता वाधवान 41, टिना वाधवान 13, धिरज वाधवान 40, कार्तिक वाधवान 19, पुजा वाधवान 41, युव्हिका वाधवान 16, आहान वाधवान 7 यांचेसह त्यांचे बरोबर असलेले त्यांचे कर्मचारी शत्रुघ्न घाग 48, मनोज यादव 43, मनोज शुक्ला 45, अशोक चाफेलकर, 45, दिवानसिंग 48, अमोल मंडल 42, लोहीत फर्नांडीस 33, जसप्रित सिंग 30, जस्टीन डिमेलो 43, इंद्रकंात चौधरी 52, एलिजाबेथ आययापिलाई 42, रमेश शर्मा 4, प्रदिप कांबळे 27 व तारका सरकार 39 यांना महाबळेश्वरातील त्यांच्याच बंगल्यात होम क्वारंटार्इन पुन्हा स्थानबद्ध करण्यात आले आहे.
दरम्यान वाधवान यांनी संचार बंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असला तरी होणारी अटक तांत्रिक आहे .दुसऱ्या गुन्ह्यात सीबीआयने स्टे ऑर्डर दिली आहे .असे असले तरी वाधवान यांनी यापूर्वी महाबळेश्वरात एका लग्नाच्या निमित्ताने बेकायदेशीर हेलिकॉप्टर लँडिंग केले होते. याबाबत तक्रार झाली आहे. तसेच माध्यमांनीही आवाज उठवला आहे .तत्कालीन शासकीय यंत्रणेने वाधवान यांना मदत केल्यामुळे वाधवान बचावले. आता सध्याचे सातारा चे जिल्हाधिकारी शेखर सिंह व जिल्हा पोलीस प्रमुख तेजस्वी सातपुते यांनी हेलिकॉप्टर लँडिंग प्रकरणात वाधवान यांच्यावर अद्याप गुन्हा दाखल केला नाही असा सवाल जिल्हावासिय करत आहेत.

: वाधवान येण्यापुर्वीच महाबळेश्‍वर रायफलधारी पोलिसांनी या बंगल्याचा ताबा घेतला होता. वाधवान यांच्या बरोबर सशस्त्र पोलिस दलाची एक तुकडी होती. महाबळेश्‍वर येथे येताच पुन्हा सर्वांची वैदयकिय तपासणी करण्यात आली या सर्वांच्या हातावर होम क्वारंटार्इनचे शिक्के मारण्यात आले आहेत .