येरळवाडी मध्यम प्रकल्प कार्यलयात विविध पदांचा तुटवडा; अधिकाऱ्यासह शेतकऱ्यांना बसतोय फटका ; अनेक पदे रिक्त असल्याने अधिकाऱ्यावर वाढतोय कामाचा ताण : रिक्त पदे भरण्याची गरज

वडूज / प्रतिनिधी :-खटाव तालुक्यातील वडूज शहरात असलेल्या येरळवाडी मध्यम प्रकल्प कार्यालयात असलेल्या कर्मचाऱ्यांचा तुटवडयाने कार्यभार संभाळणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यावरील ताण वाढत असल्याने या ठिकाणी असलेली मंजूर रिक्त पदे भरण्याची गरज आहे.
येरळवाडी मध्यम प्रकल्प उपविभाग कार्यलय अंतर्गत दोन शाखा आहेत. यामध्ये वडूजसाठी २२ पदे मंजूर आहेत. तर अंबवडे साठी २२ मंजूर पदे मंजूर आहेत. यामध्ये प्रामुख्याने शाखा अभियंता म्हणून ३ पदे मंजूर आहेत मात्र ही तीनही पदे रिक्त आहेत. तर दप्तर कारकून ३ पदे मंजूर आहेत तर सध्या अंबवडे वडूज साठी एकच दप्तर कारकून कार्यरत असून सध्या दोन पदे रिक्त आहेत.
याच विभागात मोजणीदार साठी ८ पदे मंजूर आहेत आणि विशेषतः ही ८ ही पदांची जागा रिक्त आहेत. अंबवडे, वडूज साठी कालवा निरीक्षक एकूण १६ पदे मंजूर आहेत. मात्र सध्या हा पदभार फक्त
दोनजनांकडेच असून १४ पदे रिक्त आहेत. तर कालवा चौकीदार पदासाठी ६ मंजूर पदे आहेत. मात्र सध्या हा कारभार फक्त चार व्यक्तीवर पाहिला जात आहे. तर २ पदे रिक्त आहेत.
या विभागात असलेल्या स्थापत्य अभियांत्रिकी सहायक साठी २ पदे मंजूर आहेत मात्र या पदावर काम करण्यासाठी एक ही व्यक्ती कार्यरत नाही.
प्रत्यक्ष सिंचन कार्यक्षेत्रावर सिंचन व्यवस्थापक म्हणून काम करणारा शाखा अभियंता एक ही नसल्याने या कामासाठी प्रत्यक्ष सहायक अभियंता श्रेणी १ च्या अधिकाऱ्याला हे काम पाहावे लागत असल्याचे चित्र आहे.
तर शाखा अभियंता यांना सहाय्य करण्यासाठी असलेल्या स्थापत्य अभियांत्रिकी सहायक हे पद ही रिक्त असल्याने यासाठी काम करणारा कर्मचारी नसल्याने अनेक कामे करताना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे चित्र आहे.
तर कालवा असलेल्या ठिकाणी प्रत्यक्ष देखरेख करणे दुरूस्ती करण्यासाठी असलेली कालवा निरीक्षक पदासाठी काम करणारी यंत्रणा फक्त दोन कर्मचारी सांभाळत आहेत. तर यासाठी १४ कर्मचाऱ्यांची जागा रिक्त आहे त्यामुळे या कामाचा ताण ही या दोन कर्मचाऱ्यांवर आहे.
या विभाग असलेले क्षेत्र मोजमाप करण्यासाठी स्वतंत्र मोजणीदार हे पद आहे. मात्र ८ पदे मंजूर असून ही यासाठी काम करणारा एक ही मोजणीदार या विभागात कार्यरत नाही.
यामुळे याठिकाणी असलेल्या कर्मचाऱ्यांच्या तुठवड्याचा फटका या ठिकाणी असलेल्या अधिकाऱ्यांसह सर्वसामान्य जनतेला बसत आहे. सामान्य नागरिकांची असलेली काही कामे यामुळे प्रलंबित राहत असल्याचे दिसून येते. तर लगतच असलेल्या उरमोडी सिंचन विभागात सुद्धा अशीच परिस्थिती असून याठिकाणी सुद्धा अनेक पदे रिक्त आहेत. त्यामुळे आता या विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या ठिकाणी रिक्त असलेल्या पदांसाठी लवकरच मार्ग काढावा अशी मागणी आता जनतेतून होताना दिसून येत आहे.

 

 

अनेक रिक्त पदे असल्याने प्रलंबित कामाचा निपटारा होत नाही. पाणीपट्टी, सिंचन, बिगर सिंचन आकारणी, व वसुलीस विलंब होत आहे. त्यामुळे या कामाचा ताण याठिकाणी असलेल्या कर्मचाऱ्यांवर पडत आहे. त्यामुळे रिक्त पदे भरल्यास शेतकऱ्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी मदत होईल.

श्री . वी.म. बनसोडे
( सहायक अभियंता श्रेणी १ )