सातारा : सध्याच्या जगात प्रामाणिकपणा लोप पावत आहे, अशी भावना असताना पत्रकार शंकर कदम यांनी आज त्यांना सापडलेले 10 हजार रुपये असणारी पर्स बचत गटाच्या अध्यक्ष संगीता फल्ले यांना प्रमाणिकपणे परत केले.
पत्रकार शंकर कदम हे दुपारी 1 वाजता राधिका रोडच्या बाजुला असणार्या रसवंतीगृहात उसाचा रस पिण्यासाठी गेले होते. त्याचवेळी येथे बचत गटाच्या अध्यक्ष श्रीमती फल्ले याही तेथे रस पिण्यासाठी आल्या होत्या. श्रीमती फल्ले रस पेवून निघून गेल्या. त्याच वेळी पैसे देताना त्यांची पर्स तेथेच विसरुन गेल्या. पत्रकार कदम यांनी श्रीमती फल्ले यांचा शोध घेतला परंतु त्यांचा शोध लागला नाही. श्री. कदम यांनी परत रसवतीगृहात जावून पर्सबाबत कुणी विचारणा केल्यास माझा मोबाईल क्रमांक द्या असे सांगून त्यांनी स्वत:चा मोबाईल क्रमांक रसवंतीवाल्याला दिला
काही वेळानंतर रसवंतीगृहातून श्री. कदम यांना फोन आल्यानंतर ते रसवतीगृहात जावून श्रीमती फल्ले यांना त्यांची 10 हजार रुपये असणारी पर्स दिली. आजच्या जगात सापडलेले दहा हजार प्रमाणिकपणे परत करुन पत्रकार शंकर कदम यांनी आदर्श दाखवून दिला.