रेठरे बुद्रुक ः कृष्णा कारखाना एक कुटुंब असून सभासद, कर्मचारी व तोडणी वाहतूकदार हे या कुटुंबाचे प्रमुख सदस्य आहेेत. आपण सर्वांनी एकसाथ राहिल्यास संस्थेची प्रगती कोणही रोखू शकणार नाही. असे प्रतिपादन कारखान्याचे चेअरमन डॉ.सुरेश भोसले यांनी केले. यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याचा सन 2018-19 च्या गळीत हंगामाचा सांगता समारंभ चेअरमन डॉ.सुरेश भोसले यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आला, यावेळी ते बोलत होते. कारखान्याचे संचालक लिंबाजीराव पाटील व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ.कविता पाटील यांच्या शुभ हस्ते सत्यनारायण पूजा करण्यात आली. हा गळीत हंगाम यशस्वी करण्यासाठी योगदान दिलेल्या तोडणी मजूर, मुकादम, कंत्राटदारांचा सत्कार यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. व्हा.चेअरमन जगदीश जगताप, संचालक गुणवंतराव पाटील, धोंडीराम जाधव, जितंेंद्र पाटील, दयानंद पाटील, संजय पाटील, दिलीपराव पाटील, निवासराव थोरात, अमोल गुरव, पांडूरंग होनमाने, ब्रिजराज मोहिते, सुजित मोरे, कार्यकारी संचालक सूर्यकांत दळवी, बहेचे उपसरपंच मनोज पाटील, कराड तालुका साखर कामगार संघाचे अध्यक्ष एम.के.कापूरकर यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ.सुरेश भोसले पुढे म्हणाले अधिकारी, ऊस तोडणी मजूर ,वाहतूक कंत्राटदार व कर्मचारी यांच्या परिश्रमामुळे कारखान्याने चांगली कामगिरी केली आहे. पुढील गळीत हंगाम हा ऑक्टोबर महिन्यात सुरू करण्याच्या दृष्टीने पूर्वतयारी करावी लागणार आहे. कारखान्याची यंत्र सामुग्री 60 वर्षे जुनी असल्याने काही तांत्रीक अडचणी येतात. परंतू या अडचणींवरही मात करत कारखान्याने उत्कृष्ट कामगिरी केली आहे असे गौरवोद्गार चेअरमन डॉ.सुरेश भोसले यांनी काढले. कार्यकारी संचालक सूर्यकांत दळवी म्हणाले, कारखान्याच्या गळीत हंगामात उसतोडणी वाहतुकदार यांनी चांगले सहकार्य केले. नेहमीच उसतोडणी वाहतुकदारांच्याकडून कारखान्यास चांगले सहकार्य होत असते असे सांगत कारखाना प्रगतीचा आलेख सादर केला. उत्कृष्ठ गट कार्यालय म्हणून रेठरे बुद्रुक गट कार्यालयाचा सन्मान चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या हस्ते करण्यात आला. सेक्रटेरी मुकेश पवार, जनरल मॅनेजर (टेक्निकल) पी. डी. राक्षे, चिफ इंजिनिअर सुहास घोरपडे, प्रोसेस मॅनेजर डी. जी. देसाई, फायनान्स मॅनेजर सी.एन.मिसाळ, असि.जनरल मॅनेजर डिस्टीलरी प्रतापसिंह नलवडे, मुख्य शेती अधिकारी प्रकाश सूर्यवंशी, को-जन मॅनेजर गिरीश इस्लामपूरकर, ऊसविकास अधिकारी पंकज पाटील, ई.डी.पी मॅनेजर अवधूत रेणावीकर, लेबर अॅन्ड वेल्फेअर ऑफिसर अरूण पाटील, पर्चेस ऑफिसर रविंद्र देशमुख, केनयार्ड सुपरवायझर विजय मोहिते, उसपुरवठा अधिकारी अजय दुपटे, वाहतुक अधिकारी गजानन प्रभुणे, स्टोअर किपर जी. बी. मोहिते यांच्यासह सर्व अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वागत व प्रास्ताविक कार्यकारी संचालक सुर्यकांत दळवी यांनी केले. रामभाऊ सातपुते यांनी सुत्रसंचालन केले. धोंडीराम जाधव यांनी आभार मानले.
कृष्णा कारखाना एक कुटुंबः डॉ.सुरेश भोसले
RELATED ARTICLES

