परळी : उरमोडी प्रकल्पग्रस्त वेणेखोल गावातील ग्रामस्थांनी लोकसभेच्या दिनांक 23 एप्रिल, 2019 रोजी होणाऱया मतदानावर बहिष्कार टाकण्याचा घेतला निर्णय घेतला आहे.
सातारा लोकसभा मतदार संघातील उरमोडी धरणग्रस्त वेणेखोल हे गांव गेली 20 वर्षापासून पुर्नवसनासाठी वंचित राहिल्याने मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला असून तशी सुचना जिल्हाधिकारी व जिल्हापुनर्वसन अधिकारी कार्यालयास एक महिन्यापुर्वी दिली असून ग्रामस्थांनी केलेल्या मागणीसंदर्भात शासनाकडून कोणतीही कार्यवाही सुरु नाही किंबहुना पुर्नवसनाचे कामकाज जाणीवपुर्वक प्रलंबित ठेवुन प्रकल्पग्रस्तांना हतबल करण्याचा काही अधिकाऱयांनी चंग बांधला असल्याने 23 एप्रिल रोजी होणाऱया लोकसभा निवडणुकीत मतदान न करण्याचा निर्णय घेतला आहे.
गेल्या 20 वर्षापासूनचा पुनर्वसनाचा प्रलंबित प्रश्न असून त्यावर शासनाकडून कोणतीच कठोर भुमिका घेताना दिसत नाही. लोकशाही दिन यादिवशी मुख्यमंत्र्यांनी व्हीडीओ कॉनफरस घेवून ग्रामस्थांशी थेट संवाध साधत वेणेखोल येथील पुनर्वसनाबबत सकारात्मक असल्याचे सांगितले. तसेच याविषयावर शासकीय अधिकाऱयांना सुचना देखील दिल्या होत्या. मुख्यमंत्र्यांच्या या आदेशाकडे कानाडोळा करत वेणेखोल पुनर्वसन प्रक्रिया रखडवत ठेवली आहे. गेल्या काही वर्षापासून ग्रामस्थांच्या माध्यमातून उरमोडी धरणार अंदोलने करण्यात आली परंतु आश्वासने ीदवून चाल ढकल करण्याचा प्रयत्न अधिकाऱयांकडून होत आहे.
वेणेखोल येथील ग्रामस्थांना पळशी, किरीकसाळ या ठिकाणी पुनर्वसन निश्चित करण्यात आले होते परंतु धरणातील पाणी अचानक वाढवल्याने कातवडी या गावचे मोठे नुकसान झाले होते. सामाजिक बांधिलकी म्हणून वेणेखोल ग्रामस्थांनी कातवडी या गावाला प्राधान्याने पुनर्वसन द्यावी नंतर वेणेखोल गावचे पुनर्वसन करावे अशी भुमिका घेतली होती. कातवडी या गावावाला पळशी येथे पुनर्वसन मिळाले परंतु वेणेखोल पुनर्वसनाबाबत अधिकारी वर्ग गांभिर्याने घेत नसल्याने 23 एप्रिल रोजी होणाऱया लोकसभेच्या निवडणूकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय ग्रामपंचायत वेणेखोल पुनर्वसन कमिटी व ग्रामस्थांनी घेतला आहे. तसेच हे निवेदन देताना शिवराम सकपाळ, परशुराम सकपाळ, बाळकृष्ण् सकपाळ, अमोल सकपाळ, विठ्ठल सकपाळ, बाळासाहेब सकपाळ, चंद्रशेखर सकपाळ उपस्थित होते.
मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला अधिकार्यांकडून केराची टोपली
निर्मल ग्राम योजना पुरस्कार विजेता तसेच महात्मा गांधी तंटामुक्ती पुरस्कार, पर्यावरण विकासरत्न पुरस्कार अशा तीन शासनाचे पुरस्कार प्राप्त तसेच आदर्श गाव म्हणून संपुर्ण पंचक्रोशीत वेणेखोल या गावाची ओळख आहे. लोकशाही दिनादिवशी मुख्यमंत्र्यांनी वेणेखोल ग्रामस्थांनी व्हीडीओ कॉनफरस ने संवाध साधला यावेळी ग्रामस्थांनी गावच्या पुनर्वसनाचा प्रश्न ांवर आवाज उठवला यावर सकारात्मक प्रतिसाद देत संबंधित अधिकाऱयांना तसे आदेश ही देण्यात आले परंतु या आदेशाची पायमल्ली होतानाचे चित्र सध्या दिसत आहे.
वेणेखोल ग्रामस्थांचे लोकसभेच्या मतदानावर बहिष्कार ; पुनर्वसनाबाबत अधिकाऱयांकडून टोलवाटोलवी
RELATED ARTICLES

