परळी : डबेवाडी गावाच्या 100 फूटावर असलेल्या बांधाला अज्ञात व्यक्तीकडून गुरुवारी रात्री 12 च्या सुमारास पेटवण्यात आले. आगीची तीव्रता मोठी असल्याने बांधावर स्थिरावलेले जांभळाचे झाड संपुर्ण जळून खाक झाले.
दरम्यान, हे जळालेले जांभळीचे दैनंदीन वाहतुकीच्या रस्त्यावर पडल्याने सकाळपासून युध्द पातळीवर सुरु होते परंतु दुपारी 4 वाजेपर्यत रस्त्यावरील झाड हटवण्याचे काम सुरु होते. यामुळे बोगदा सज्जनगड रस्त्यावर वाहतुकीचा खोळंबा झाला होता. अशा वणवा तसेच आग लावणाऱया विकृत लोकांवर संबंधीत विभागाने योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.
बांधाने घेतला जांभळीच्या झाडाचा जीव ; अज्ञात व्यक्तीकडून बांधाला लावली आग, दुपारी चार वाजेपर्यंत वाहतूक खोळंबली
RELATED ARTICLES

