सातारा :डॉ बाबासाहेब आंबेडकर विकास मंडळ व वीर जिजामाता समाज उन्नती महिला मंडळ ,सम्राट अशोक नगर, मेढोंशी ता.पाटण यांच्या विद्यमाने भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा 128 जयंती उत्सव सोमवार दिनांक 15 एप्रिल रोजी नामदेव कंटे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होत आहे तरी नागरिकांनी उपस्थित रहावे. असे आवाहन सयोजकाकडून करण्यात आले आहे .
सकाळी नऊ वाजता ध्वज वंदन मोहन सत्वधीर यांच्या हस्ते, सकाळी साडेनऊ वाजता बुद्ध सूत्र पठण, सकाळी 11 ते 1 महिला व मुलींचे साठी संगीत खुर्ची चे आयोजन, दुपारी तीन वाजता भव्य कुस्तीचे आयोजन, सायंकाळी पाच वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यातील तैल चित्राची घोडे रथातून मिरवणूक ,सायंकाळी सहा वाजता महिला मंडळाच्या नामफलकाचे उद्घाटन, सायंकाळी सात वाजता जाहीर सभा .
यावेळी भारत देशाच्या रक्षणासाठी आयुष्य खर्ची घालणार्या संपूर्ण मेंढोशी गावातील आजी माजी सैनिकांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात येणार आहे तसेच ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात येणार आहे तसेच दहावी बारावी व पदवीधर विद्यार्थ्यांचा उत्तेजनार्थ सन्मान करण्यात येणार आहे .तरी नागरिकांनी या कार्यक्रमाला बहुसंख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन डॉ. बाबासाहेब आंबेडकर विकास मंडळ व वीर जिजामाता समाज उन्नती महिला मंडळ मेंढोशी व मुंबई कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.
मेंढोशी येथे दि.15 रोजी डॉ.आंबेडकर जयंतीचे आयोजन
RELATED ARTICLES

