वडूज : चाफळ (ता. पाटण )येथे सोमवार दि .13 एप्रिल रोजी शिवसमर्थ दिव्य भेट सोहळ्याचे आयोजन केल्याची माहिती संदीप महिंद गुरुजी यांनी दिली.
छत्रपती शिवाजी महाराज व रामदास स्वामी यांच्या भेटीच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी चार वाजता श्रीराम मंदिरापासून सोहल्यास प्रारंभ होणार असून शिंगणवाडी गावठाण हद्दीत समाप्ती होणार आहे. यावेळी दिवशी येथील प. पू. धारेश्वर महांराज ,तुकाराम महाराजांचे वंशज माणिकराव मोरे (बुआ),रामदास स्वामींचे वंशज भूषण स्वामी, प्रांताधिकारी श्रीरंग तांबे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यावेळी दुर्ग संरक्षक के. एन. देसाई यांचे व्याख्यान होणार आहे. कार्यक्रमा स आ. शंभूराजे देसाई, युवानेते सत्यजित पाटणकर, भाजपा जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर,पुण्याचे माजी नगरसेवक मिलिंद एकबोटे आदिनाहीं निमंत्रित केले आहे .अधिक माहितीसाठी प्रदीप 9764319641,विजय -8698914551 या क्रमांकाशी संपर्क साधण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे
चाफळ येथे दि.13 रोजी शिवसमर्थ दिव्य भेट सोहळ्याचे आयोजन
RELATED ARTICLES

