पाटण :- पहिल्या लेखा मध्ये आपण पाहिले की, रुग्णालयातून कोरोणाची कशा प्रकारे लागण होऊ शकते, तर दुसऱ्या लेखा मध्ये रुग्णालयातून लागण होऊ नये यासाठी उपाय योजना काय कराव्या लागतील हे पाहिले, यामध्ये आपण एक संज्ञा वापरली ” *फोटो ओ.पी. डी.* ” त्या ऐवजी ” *आऊटडोअर ओ. पी. डी.”* हा शब्दही वापरू शकतो. या साठी रुग्णालयाच्या बाहेरच्या बाजूला मांडव ही टाकू शकतो. (रुग्णांना उन्हाचा त्रास होऊ नये यासाठी.)
कोरोनाची लागण साखळी तोडायची असेल तर प्रामुख्याने लोकांचे बाहेर येणे जाणे, गर्दी करणे या सर्व गोष्टींवर फक्त नियंत्रण नाही, तर पूर्णपणे अंकुश हवा. सुज्ञ नागरिकांनी वेळोवेळी सरकारनी सांगितलेल्या गोष्टी पाळायला हव्यात. गर्दी कमी किंवा पूर्ण बंद करावयाची असेल तर पुढील काही गोष्टींची तजवीज करावी लागेल.
*१. मोबाईल नमुने घेणारे पथक (Mobile Sampling Unit)*
या पथकामुळे संशयित रुग्णांची हालचाल कमी होऊन प्रसार रोखण्यात यश मिळेल. रुग्णांचे घशातील व नाकातील नमुने घेण्यासाठी तालुका स्तरावर किंवा दोन तालुक्यांच्या स्तरावर हे एक पथक असावे.
संशयित रुग्ण हे संस्थात्मक विलगी करण केले जातात. सध्या त्यांचे नमुने घेण्यासाठी तेथून त्यांना दुसऱ्या रुग्णालयात नेण्यात येते. परंतु तेथे इतर रुग्णांची गर्दी असू शकते. त्यांनाही हा प्रादुर्भाव होऊ शकतो. त्याच बरोबर त्या रुग्णांना बेड दिले जातात व नंतर त्यांचा फॉर्म भरणे सुरू होते तो फॉर्म भरायला व इतर गोष्टीत खूप वेळ जाऊ शकतो. तोपर्यंत हे संशयित रुग्ण त्या रुग्णालयात असतात.
या पथकातील वाहनांमध्ये घडी घालण्या सारखे नमुना घेण्याची जाळी (Sampling cage) असावी. ज्यामुळे नमुना घेणाऱ्याला लागण होण्याचा धोका कमी होतो. ही जाळी जेव्हा हवी तेंव्हा काढू शकतो व घडी घालून ठेऊ शकतो. त्यामुळे PPE किट वरील खर्च कमी होईल. नंतर हे सर्व तालुक्यातील नमुने जिल्ह्याच्या ठिकाणी सर्व साधारण रुग्णालयात (Civil Hospital) एकत्र येऊन पुढे तपासनीस पाठवले जाऊ शकतात.
*२. फिरते किराणा दुकान*
किरानामाल घेण्यासाठी लोक बाहेर येत आहेत व गर्दी होत आहे. या साठी ही योजना सुरू करू शकतो. या मध्ये गावामधील किराणा दुकान असणारे मालक इच्छूक असतील तर त्यांना गाडीतून माल विकण्याचे परवाने द्यावेत. या वाहनात ही माईकिंग ची सुविधा असावी. या वाहनाची प्रत्येक गल्ली मध्ये येण्याची व जाण्याची वेळ निश्चित करावी जेणे करून लोक तयार राहतील. या वाहनाच्या येथे गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी. एका वेळेस एकाच व्यक्तीला माल देण्यात यावा.
शक्यतो किराणा दुकान मालकाचा मोबाईल नंबर व व्हॉटसअप नंबर लोकांपर्यंत पोहोचावा असे नियोजन करावे. ज्या मुळे लोक आपल्या किराणा मालाची मागणी किंवा यादी किराणा मालकाला पाठवील. जमले तर स्वतः चा पत्ता किंवा व्हॉटसअप ठिकाण ( location) देईल. तो माल घरपोहच होईल. माल घरात घेताना त्या मालाच्या पिशव्यांवर डिटर्जंट चा स्प्रे मारावा व मग आत घ्यावा. त्यानंतर अर्ध्या तासाने तो वापरण्यास घ्यावा.
*टीप*- देण्या घेण्यात येणारे पैसे, नोटा पुन्हा निर्जंतुक स्प्रे मारून वाळण्यास ठेवून द्यावे.
अजून काही गोष्टी कराव्या लागतील त्या पुढच्या अंकात पाहू….
सहकार्य करा घराबाहेर पडू नका
आपला मित्र,
श्री संपा.
मायक्रो बायोलॉजिस्ट
शासकीय रुग्णालय महाराष्ट्र.