वार्ताहर
परळी
गेल्या वर्ष भरापासून संपुर्ण जगाला वेठीस धरणारा कोरोना पुन्हा महाराष्ट्रात सक्रिय होत असून तीतक्याच प्रभाविपणे संपुर्ण जिल्हय़ांमध्ये कोरोना लसीकरण वेगाने होत आहे. रविवारी सातारा जिल्हय़ातील बहुतांश प्राथमिक आरोग्य केंद्रांना लसीकणाची मान्यता देत लसीकरणाची व्याप्ती ही वाढविली आहे. परळी प्राथमिक आरोग्य केंद्रात सिताराम सावळू निपाणे (रा. निगुडमाळ) या 66 वर्षीय ज्येष्ठ नागरिकास प्रथम कोविशिल्ड ही लस देवून लसीकरणास प्रारंभ करण्यात आला. यावेळी पंचायत समिती उपसभापती अरविंद जाधव, पंचायत समिती सदस्या विद्याताई देवरे, परळीचे सरपंच बाळासाहेब जाधव, उपसरपंच नंदकुमार धोत्रे, वैद्यकिय अधिकारी डॉ. सचिन यादव, डॉ. उर्मिला बनगर यांच्या उपस्थितीत लसीकरणाचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी डॉ. सचिन यादव म्हणाले, परळी दऱयाखोऱयातील कारोना वाढता प्रभाव परळी आरोग्य केंद्रातील सर्वच कर्मचाऱयांनी मोठय़ा साहसाने तोंड देत हद्दपार केला आहे. यामध्ये ग्रामस्थांचेही सहकार्य होतेच याच पार्श्वभूमीवर परळी येथे लसीकरणाचा शुभारंभ झाला. आठवडय़ातील सोमवार, बुधवार, शुक्रवार या दिवशी कोरोना लसीकरण करण्यात येईल. नोंदणी करीता सेल्फ रजिस्ट्रेशन, ग्रामपंचायत येथे नोंद, अन्यथा परळी आरोग्य केंद्रात येवून नोंदणी करता येईल. परिसरातील 60 वर्षावरील सर्वांना तसेच 45 ते 59 या वयोगटातील व्याधी ग्रस्त नागरिकांना लस देण्यात येणार आहे. ही लस सुरक्षीत असून सर्वांनी निसंकोचपणे घ्यावी. डॉ. सचिन यादव यांनी लसीकरणास उपस्थित राहण्याचे अवाहन केले आहे. यावेळी परळी येथील ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ उपस्थित होते.
चौकट
दररोज 100 जाणांना होणार लसीकरण
परळी भागातील लसीकरण हे आठवडय़ातील सोमवार, बुधवार, शुक्रवार तिन दिवस होणार असून दैनंदीन लसीकरणात 100 जाणांना लस दिली जाणार असून यादिवशी सकाळी 9 ते 5 वेळेत लसीकरण होणार आहे.