सातारा : माहुली पुलाच्या नजीक रोडवर वडाप जीपच्या चालकाचे गाडीवरील ताबा सुटल्याने जीप पुलाच्या बाजुला 10 फुट खाली गेल्याने पाच जण जखमी झाले आहे.
जखमींवर जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचार करून सोडून देण्यात आले. शाहीन जमीर आतार वय 32, शहनाज युसुफ तांबवी वय 49, दोघे रा. पुसेगाव, यास्मीन तांबवी वय 29 रा. निमसोड ता. खटाव, दिपक चंद्रकांत कदम वय 26 व शीतल माने वय 27 दोघे रा. ल्हासुर्णे ता. कोरेगाव अशी जखमींची नावे आहेत. या घटनेची रात्री उशीरापर्यंत सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंद झाली नव्हती.