सातारा : चीन देशाचे सिचवॉन प्रांताचे विधिमंडळ संसदीय शिष्टमंडळांने शुक्रवार दि.24 नोव्हेंबर,2017 रोजी महाराष्ट्र विधिमंडळास भेट दिली. देशातील सर्वात लोकशाही मध्ये मोठया असणा-या महाराष्ट्र राज्याच्या संसदीय कार्यप्रणालीचा अभ्यास करण्याकरीता आलेल्या चीनच्या सिचवॉन संसदीय शिष्टमंडळाने शेतीप्रधान महाराष्ट्र राज्याने कृषी क्षेत्रामध्ये आधूनिकीकरण आणून भरीव कामगिरीतून केलेली प्रगती तसेच औद्योगिक क्षेत्रामध्ये मोठया प्रमाणात केलेली गुंतवणूकीचे कौतुक करुन महाराष्ट्राच्या या प्रगती आदर्शवत आहे असे कौतुकास्पद उद् गार काढले. यावेळी चीनच्या उद्योजकांनी उद्योगाकरीता पोषक वातावरण असणा-या महाराष्ट्राच्या औद्योगिक क्षेत्रात गुंतवणूक करावी अशी आग्रही मागणी महाराष्ट्र विधिमंडळातील उपस्थित शिष्टमंडळाने यावेळी केली.
शुक्रवार दि.24 नोव्हेंबर, 2017 रोजी महाराष्ट्राच्या संसदीय कार्यप्रणालीचा अभ्यास करण्याकरीता आलेल्या चीन देशाचे सिचवॉन प्रांताचे विधिमंडळ संसदीय शिष्ट मंडळांचा महाराष्ट्र विधीमंडळाच्या वतीने महाराष्ट्र विधिमंडळात प्रांरभी यथोचित सत्कार करण्यात आला. त्यानंतर सिचवॉन प्रांताचे विधिमंडळ संसदीय शिष्टमंडळ आणि महाराष्ट्र विधिमंडळाचे शिष्टमंडळ यांची उच्चस्तरीय संयुक्तीत बैठक विधीमंडळ येथे संपन्न झाली. यावेळी महाराष्ट्र विधानपरिषद सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, शिवसेना पक्षाचे पक्ष प्रतोद महाराष्ट्र विधानसभेतील उत्कृष्ट संसदपटु असणारे पाटणचे आमदार शंभूराज देसाई, काँग्रेस पक्षाच्या वतीने आमदार संजय दत्त, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आमदार हेंमत टकले, महाराष्ट्र विधीमंडळाचे प्रधान सचिव अनंत कळसे, उद्योग विभागाचे प्रधान सचिव अपुर्व चंद्रा,राजशिष्टाचार विभागाचे सचिव राजगोपाल देवरा, सिचवॉन प्रांताचे विधिमंडळ संसदीय शिष्टमंडळामध्ये लिऊ जी, लिऊ डॉन्ग,स्कु जीन,चेंग गौंघो, झांग टाऊ,वँग फेगंछु,झाओ यंग,ली हाईंग,डाय पिंग,चेंग बिगंक्युंग व झांग झिजे या मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. महाराष्ट्र विधीमंडळात सिचवॉन प्रांताचे विधिमंडळ संसदीय शिष्टमंडळ व महाराष्ट्र विधीमंडळातील शिष्टमंडळ यांच्या संयुक्तीक झालेल्या बैठकीत सिचवॉन प्रांताचे विधिमंडळाचे तसेच महाराष्ट्र विधीमंडळाचे संसदीय कामकाज कशाप्रकारे चालविण्यात येते यासंदर्भात सविस्तरपणे चर्चा झाली. यामध्ये सिचवॉन प्रांताचे विधिमंडळ संसदीय शिष्टमंडळाने देशातील सर्वात लोकशाही मध्ये मोठया असणा-या महाराष्ट्र राज्याच्या संसदीय कार्यप्रणालीची माहिती समजुन घेतली. प्रामुख्याने राज्यातील महाराष्ट्र विधीमंडळातील सर्व लोकप्रतिनिधी हे अभ्यासूपणाने आपआपल्या विभागातील विकासाच्या दृष्टीने धोरणात्मक असे निर्णय विधानसभेत अथवा विधानपरिषदेत करुन घेतात महाराष्ट्र राज्याची संसदीय कार्यप्रणाली अतिशय उत्कृष्ट व आदर्श देणारी आहे. महाराष्ट्र राज्याने आधूनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन कृषी क्षेत्रात केलेले कार्य अतुलनीय आणि उल्लेखनीय आहे.तसेच औद्योगिक क्षेत्रामध्ये महाराष्ट्र राज्याने मेक इन महाराष्ट्र करणेकरीता मोठया प्रमाणात औद्योगिक गुतंवणूकीत उचललेले पाऊल हे कौतुकास्पद आहे. असे सांगून या शिष्टमंडळाने शासनाच्या विविध योजना तसेच महाराष्ट्र विधीमंडळातील विधानसभा व विधानपरिषदेतील कामकाजांचे विविधांगी अवलोकन केले.तसेच चीन देशानेही कृषी क्षेत्रात आधूनिकीकरणातून प्रगत शेतीकरीता विविध उपाययोजना राबविल्या आहेत. कृषी क्षेत्रातील चीनचे कार्य पाहणेकरीता महाराष्ट्र विधिमंडळातील सदस्यांनी आवर्जुन यावे असे निमंत्रणही सिचवॉन प्रांताचे विधिमंडळ संसदीय शिष्टमंडळाने उपस्थित महाराष्ट्र विधिमंडळ शिष्टमंडळास दिले. दरम्यान यावेळी सिचवॉन प्रांताचे विधिमंडळ संसदीय शिष्टमंडळाशी चर्चा करताना महाराष्ट्र विधानपरिषद सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर,शिवसेना पक्षाचे पक्ष प्रतोद उत्कृष्ट संसदपटु आमदार शंभूराज देसाई यांचेसह उपस्थित सर्व सदस्यांनी उद्योग, व्यवसायाकरीता पोषक असे वातावरण असणा-या तसेच मोठया प्रमाणात परदेशी गुतंवणूकही झालेल्या महाराष्ट्र राज्याची चीनच्या उद्योजकानी निवड करुन महाराष्ट्राच्या औद्योगिक क्रांतीमध्ये सहभागी व्हावे अशी आग्रही मागणी सर्वांनीच सिचवॉन प्रांताचे शिष्टमंडळास यावेळी केली.
महाराष्ट्रातील कृषी क्षेत्रातील प्रगती व औद्योगिक क्षेत्रातील गुंतवणूक कौतुकास्पद
RELATED ARTICLES