सातारा : बी.ई.जी. सेंटर (पुणे खडकी) मार्फत युनिट कोट्यातून आजी, माजी सैनिक, विधवांची मुले यांच्यासाठी सोल्जर जी.डी., टेक्नीकल, स्पोर्ट मॅन (ओपन) इत्यादी पदांसाठी 4 ते 8 डिसेंबर 2017 या कालावधीत भगत पावेलियन, ट्रेनिंग बटायिन-1 बॉम्बे इंजिनिरिंग ग्रुप आणि सेंटर खडकी पुणे येथे भरतीचे आयोजन करण्यात आले आहे. या संधीचा जास्तीत जास्त युवकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी आर.आर. पाटील यांनी केले आहे.