जिल्हा परिषद व पंचायत समितीची आचारसंहिता घोषित झाल्यानंतर पुढच्या चोवीस तासात राष्ट्रवादी सुप्रीमो शरद पवार यांची सभा येथील अजिंक्यतारा सहकारी कारखाना कार्यस्थळावर होत आहे पवारांची सभा म्हणजे राष्ट्रवादीसाठी आदेश असतो त्यामुळे जिल्हा परिषद निवडणुकांच्या पाश्वभूमीवर शरद पवार काय कानमंत्र देणार याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे खासदार उदयनराजे भोसले यांच्या स्वतंत्र मोर्चेबांधणीचा समाचार पवार कसा घेणार ? हा खरा औत्सुक्याचा विषय आहे शरद पवारांची राजकीय गणिते ही भल्याभल्या विश्लेषकांना समजण्यापलीकडची असतात . सरत्या वर्षात राष्ट्रवादीला अनेक राजकीय धक्के बसल्याने पक्षाच्या तंबूत अविश्वासाचे वातावरण साचून राहिले राष्ट्रवादी विरुद्ध उदयनराजे भोसले हा संघर्ष नेहमीप्रमाणे कायम राहिला कृषी सभापती शिवाजी शिंदे यांच्यावरील अविश्वास ठराव उदयनराजे समर्यक जिल्हा परिषद समर्थकांवर झालेली कारवाई विधान परिषद निवडणुकीत राष्ट्रवादीची काँग्रेसच्या साथीने उदयनराजे यांनी केलेली कोंडी यामुळे संघर्षाची दरी वाढतच गेली सातारा पालिकेत एकहाती बहुमत मिळाल्याने मनोमिलन पॅटर्न मोडीत काढणार्या उदयनराजेंचा आत्मविश्वास सांत वे आसमान पर आहे त्यातच उदयनराजे यांनी शेतकर्यांच्या निमिताने राजधानी जिल्हा विकास आघाडीची घोषणा करुन पुन्हा नवा राजकीय डाव टाकला आहे जिल्हा परिषद व पंचायत समित्यांसाठी स्वतंत्र चाचपणी सुरू करून उदयनराजे यांनी आपली राजकीय ताकत सिद्ध करण्याचा चंग बांधला आहे . या सगळ्या घटनां विरोधात गेल्याने जिल्हयात दहा पालिकांवर झेंडा रोवूनही राष्ट्रवादीला आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी पालिका निवडणुकांमध्ये करता आली नाही भाजपने जिल्हयात मुसंडी मारत कमळ फुलवले . याची दखल शरद पवारांनी या पूर्वीच घेतली आहे त्यामुळे जि प निवडणुकीत नव्या चेहर्यांना संधी व कार्यकर्त्यांचे जाळे मजबूत करण्याची स्पष्ट रणनीती शरद पवार यांनी मुंबई येथे झालेल्या बैठकीत ठरवली आहे त्यानुसार जिल्ह्यात तालुकानिहाय मेळाव्यांचे नियोजन करण्यात आले आहे सातारा जिल्ह्याची नाळ पवारांना चांगलीच ठाऊक असून झेडपीमध्ये राष्ट्रवादीची एकहाती सत्ता आणण्याचे राष्ट्रवादीचे मनसुबे आहेत . त्यामुळे शरद पवारांचे कारखाना कार्यस्थळावरचे भाषण हा कार्यकर्त्यांसाठी महत्वाचा विषय आहे उदयनराजे चा वाढता प्रभाव कसा रोखायचा ही खरी राष्ट्रवादीची डोकेदुखी आहे त्यावर पवारांची लाइन ऑफ अॅक्शन काय असणार हाच खरा महत्वाचा मुद्दा आहे उदयनराजेंचा राजकीय बंदोबस्त करणे ही राष्ट्रवादीच्या थिंक टँकची अपेक्षा आहे या अपेक्षांना पवार काय उत्तर देणार राष्ट्रवादीचे प्रचार तंत्र नक्की काय ? पवार मॅजिक काय असणार याचे आडाखे राजकीय विश्लेषकांनी मांडले आहेत सूत्रांच्या म्हणण्यानुसार सातारा कराड दक्षिण व माण तालुक्यात राष्ट्रवादीने विशेष मोर्चेबांधणीवर भर दिला आहे त्यामुळे पवारांची सभा ही राष्ट्रवादीसाठी महत्वाची असून पवारांचे भाषणं हाच खरा उद्याचा कलायमॅक्स असणार आहे.
पवारांच्या कानमंत्राकडे राष्ट्रवादीचे लक्ष
RELATED ARTICLES