कोरेगांव/साताराःरयत कुमुदाच्या विरोधात संदीप मोझर यांचे रयत कुमुदा या शुगर कंपनीकडून येणे असणारी बाकी शेतकरी, वाहतूदार यांना तात्काळ द्यावी, या मागणीसाठी उपोषण सुरू आहे. या त्यांच्या उपोषणाला कोरेगांव शहर विकास मंचचे वतीने आम्ही पाठींबा देत आहोत असे मंचचे अध्यक्ष व कोरेगांव तालुका खरेदी विक्री संघाचे विदयमान संचालक किशोर बर्गे यांनी संदीप मोझर यांना उपोषण स्थळी पाठींब्याचे पत्र देवून त्यांचे कार्यास सुयश चिंतून मंचचे वतीने पाठींबा दिला. यावेळी वृत्तपत्र लेखक रामचंद्र बोतालजी मंचचे कार्याध्यक्ष दिलीपराव बर्गे, मच्छिंद्र बर्गे बाळासाहेब बागवान, सुरेश फडतरे, दत्त दिगंबर पतसंस्थेचे व्यवस्थापक विलासराव शिंदे, नवीन बर्गे, बाबा कारंडे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मनसेचे राज्य उपाध्यक्ष संदीप मोझर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले, किशोर बर्गे म्हणजे खर्या अर्थाने सर्व सामान्यांच्या सामाजिक प्रश्नांची जाण असलेले समाज कार्यास वाहून घेतलेले असे धुरंधर व्यक्तीमत्व आहे. त्यांच्या सामाजीक व विधायक कार्यकर्तृत्वाच्या आम्ही दररोज वृत्तपत्रांतून वाचत असतो. त्यांनी कोरेगांव शहर विकास मंचचे माध्यमातून चालविलेले सामाजीक विकासात्मक शेतकर्यांच्या हिताचे व विकासात्मक चालविलेले हे स्तुत्य उपक्रम निश्चितच कौतुकास्पद आहे. त्यांच्या भावी वाटचालीस माझ्या हार्दीक शुभेच्छा देतो.विलासराव शिंदे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
दरम्यान, सातारा येथे धरणे आंदोलनास 25 दिवस आणि पाच दिवस झाले असून रयत कुमुदाप्रश्नी अद्याप शेतकर्यांना न्याय मिळत नाही. शासनाला उपोषणाचे गांभीर्य नसेल तर आम्ही न्याय हिसकावून घेवू शकतो अशी स्पष्टोक्ती संदीप मोझर यांनी सातारा येथे केली. सन 2014 च्या गळीत हंगामातील ऊस बिलाचे सुमारे 14 कोटी रूपये व्यवस्थापनाने अद्याप न दिल्याने कुमूदाचे मालक अविनाश भोसले यांचा बंगला विकून शेतकर्यांचे बिल देण्यात यावे अशी मागणीही मोझर यांनी यावेळी केली. तसेच आज बुधवारचा उपोषणाचा सहावा दिवस असल्याने हे आंदोलन उग्र स्वरूपात करणार असून उद्या दि. 12 जानेवारी पासून राष्ट्रीय युवक दिनाच्या मुहूर्तावर रास्तारोको, जाळपोळ, मोडतोड आदी हिंसक व तीव्र स्वरूपाचे आंदोलन सुरवात करणार आहोत अशा आशयाचे निवेदन सातारा तहसिलदार कार्यालयात मनसेचे शहराध्यक्ष राहूल पवार यांनी दिले. यावेळी दिलीप सोडमिसे, सुहास रणदिवे, अझर शेख, शेखर बनसोडे, महेश गोळे, सौ. अनिता जाधव आदी उपस्थित होते.