कराड : येळकोट येळकोट जय मल्हार, खंडोबाच्या नावानं चांगभल चा जयघोष, भंडारा खोबर्यांच्या अक्षतांसह वेदमंत्राच्या जयघोषात सुमारे दहा लाख भाविकांच्या साक्षीने सह्याद्रीच्या कुशीत वसलेलया पालनगरीत खंडोबा व म्हाळसा यांचा शाही विवाह सोहळा सांयकाळी गोरज मुहूर्तावर मोठ्या भक्तीपूर्ण वातावरणात पार पडला. मुख्य मिरवणुकीवेळी मंदिर परिसर तसेच नदीपात्रातील दक्षिण पात्र भाविकांनी खचाखच भरले होते.
पाल, (ता.कराड) नगरीत खंडोबा व म्हाळसा यांचा विवाह सोळा याची देही याची डोळा पाहण्यासाठी जमलेला अथांग जनसागर भंडारा खोबर्याच्या उधळणीने पिवळाधमक झाला होता. भक्तांचा पाठीराखा ओळखल्या म्हणून जाणार्या श्री खंडोबास बोहल्यावर चढताना पाहण्यासाठी यावर्षी विक्रमी भाविकांनी उपस्थिती लावली होती.
खंडोबा व म्हाळसा यांच्या शाही विवाह सोहळ्यासाठी विविध भागातून आलेले खंडोेबाचे मानकरी, मानाच्या सासनकाठ्या, मानाचे गाडे, पालखी यांच्या पाल देवस्थानचा रथ उपस्थितीत श्री खंडोबाची निघालेली शाही मिरवणूक भाविकांचे लक्ष वेधून घेत होती. दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास देवस्थानचे मानकरी देवराज पाटील रथामधून मंदिरात येत असताना तारळी नदीत पात्रात येताच भाविकांनी भंडारा-खोबर्याची उधळण करण्यास सुरूवात केली.
दुपारच्या 3.30 वा.च्या सुमारास प्रमुख मानकरी देवराज पाटील यांचे मंदिरात आगमन झाले. यावेळी मंदिरताील सवृ विधी आटोपून दुपारी 4.30 वा. च्या सुमारास मानकरी देवराज पाटील देवास पोटास बांधून अंधार दरवाजाजवळ विराजमान झाले व तेथून मुख्य मिरवणूकीस प्रारंभ झाला. मिरवणूक मंदिर परिसरातील चौकात येताच भाविकांनी येळकोट येळकोट जयमल्हार, खंडोबाच्या नावानं चांगभलं चा जयघोष करीत भंडारा खोबर्याची उधळण केली. तसेच खंडोबाचे दर्शन घेतले. मंदिर परिसरात होणारी गर्दी आटोक्यात आणणेसाठी पोलिसांनी बॅरिकेट उभारले होते.
त्यानंतर मुख्य मिरवणूक तारळी नदीपात्रात आली. यावेळी लाखो भाविकांनी भंडारा खोबर्याची उधळण करीत खंडोबा व म्हाळसा यांचा जयजयकार ेला. भाविकांनी खचाखच भरलेले तारळी नदीचे दक्षिण पात्र भंडार्याने पिवळे धमक झाले. या यात्रेत उच्चांकी उपस्थिती हे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल. सांयकाळी 5.45 वाजण्याच्या सुमारास मुख्य मिरवणूक तारळी नदीपात्रातून मारूती मंदिर मागेर्र् बोहल्यावर आली. यावेळी खंडोबाच्या जयजयकाराने परिसर दुमदुमून गेला. देव मंडपात आल्यानंतर देवास स्नान घालण्यात आले व मानकरी देवराज पाटील यांनी देवास बोहल्यावर चढविले व पारंपारिक पद्धतीने लाखो भाविकांच्या साक्षीने श्री खंडोबा व म्हाळसा यांचा विवाह सोहळा मोठ्या थाटात झाला. या विवाह सोहळ्यास उपस्थित असल्याचे भाग्य प्रत्येक भाविकाच्या चेहर्यावर जाणवत होते.
महाराष्ट्रासह आंध्रप्रदेश, कर्नाटक येथून आलेल्या भाविकांना विनासायास श्री खंडोबाचे दर्शन मिळावे यासाठी देवस्थान ट्रस्टने केेलेल्या शिस्तबद्ध दर्शनबारीचेही भाविकांकडून स्वागत होत होते. यात्रैत आलेल्या सर्व दुकानदार, व्यापारी यांनी तारही नदीच्या उत्तर पात्रात दुकाने थाटली होती. त्यामुळे उत्तर पात्रही दुकानांबरोबरच भाविकांनी तुडूंब भरले होते. लहान-मोठे पाळणे, सिनेमाचे तंबू, विविध खेळण्याची दुकाने, मेवा-मिठाईची दुकाने गजबजून गेली होती. वाघ्या-मुरळी यांचे जागरणाचे कार्यक्रम नदीचया उत्तर व दक्षिण पात्रात होत होते. प्रतीवर्षीप्रमाणे यावर्षीही वाघ्या-मुरळी यांना देवस्थानने काही नियम व अटी घालून दिले होते. त्याचे वाघ्या मुरळी यांनी पालन केल्याचे पहावयास मिळाले. संपूर्ण यात्रेवर टेहळणीसाठी खास पथक ठेवण्यात आले होते. तर जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, जिल्हा पोलिस प्रमुख संदीप पाटील, प्रांतधिकारी किशोर पवार, तहसीलदार राजेंद्र शेळके, पोलिस उपविभागीय अधिकारी राजलक्ष्मी शिवणकर, उब्रंज पोलिस ठाण्याचे सपोनि कुमार घाडगे, ग्रामविकास अधिकारी प्रदीप पाटील पाल येथे तळ ठोकून हेाते. तर आ.बाळासाहेब पाटील यांनी भाविकांचे स्वागत केले.