पाटण:- ( शंकर मोहिते )- भक्तांचे श्रद्धा स्थान असलेली गणेश देवता केवळ भारतातच नाही. तर तिचे अनेक रुपे जगभर पसरली आहेत. जसे अष्टविनायक गणपती महाराष्ट्रात वसलेले आहेत. तसेच ते जगभरात देखील वसलेली आहेत. या गणपतींचा महिमा आणि पावित्र्य हिंदु शास्त्रा प्रमानेच जगभरात देखील राखला जातो हे विषेश. “जगी अष्टविनायक” हे जगभरातील १) जपान, २) बाली, ३) श्रीलंका, ४) इंडोचीन, ५) मेक्सिको, ६) रोम, ७) अल्वी, ८) मध्य आशिया या देशात स्थापित झालेले आहे. गणेश जयंती निमित्त “जगी अष्टविनायक” दर्शन खास गणेश भक्तांसाठी..
१) जपान:- (क्युआन-शि-तिएन संप्रदाय गणेश) नवव्या शतकानंतर चिनी तज्ञाकडून माहिती घेऊन जपानमध्ये कोबोदौची डाइती यांने सर्वप्रथम जपानमध्ये गणेश स्थापन केली. पुढे गणपती दिशा रक्षक तसेच गुढ विद्याधिश ठरला. सर्वसाधारण येथील मुर्ती डिनगो-जी टाकोसन येथे असून नंतर तेथे गणेश पुजेचा प्रसार झाला. गणपती धर्मपंडीता प्रमाणे असुन महा-वै-राजन सूत्रानुसार तज्ञांनी हसतमुख गणेश स्वरूप दिले. कोबोदौची गणपती चतुर्भुज असुन कु-हाड, कुंभ, धनुष्यबाण पुष्पमाला धारी आहे. डोळे सुंदर निळसर धर्मगुरू प्रमाणे मस्तकी सुंदर शेंडी आहे.
२) बाली:- (व्दिपकल्प अग्निरुप गणेश) बालीत सर्वत्र ब्रान्झ धातूच्या मुर्ती असुन फक्त जंबरन बाली क्षेत्री भारतीय संस्कृतीची व्दिभुज पाषाण मुर्ती अग्निरुप नावे प्रसिद्ध आहे. गणपती ज्योती सिंहासनी पियाचे तळवे एकमेकास टेकवून बसला आहे. हातात मशाल, मोदकाचे ताट आहे. डोळे मोठे असून कपाळावर कमळ आहे. मुकूट सुंदर असून त्यात मौल्यवान खडा आहे. सोंड डावीकडे वळली आहे. त्या बाजूला अग्निज्वाला आहे. अंगावर सापाचे जानवे असून इंडोचीन पध्दतीचा कंबरपट्टा आहे. या गणपतीला सुर्यरुप नावे ओळखतात. बालीत राजाराणी म्रुत्यु नंतर त्यांचे पुतळे करून पुतळ्याच्या उजव्या बाजूस गणेशाची मूर्ती स्थापन करतात.
३) श्रीलंका:- (योगायोग विंदा श्री गणेश) श्रीलंका राजधानी कोलंबो पासून १५० मैल काटरगाव सुब्रमण्यम देवळात बौध्दांच्या अधिकारात गणेश मूर्ती आहे. दक्षिण भारत बालाजी प्रमाणे मुकूटाचा आकार आहे. गळ्यात जानवे, हातात दागिने आहेत. पोलो नारुआ शिवमंदिरात मुर्ती असून एकदंत चतुर्भुज हाती मोदक आयुधे आहेत. सिंहासनी अग्नीकुंड पुजारी उंदिर कोरलेला आहे. मंदिरात तुपाचे दिवे लावतात. गाभाऱ्यात भक्त महंतालाच प्रवेश मिळतो. योगायोग विंदा गणेश स्त्रोत्र बौध्द, ख्रिस्त, मुसलमान म्हणजे सर्व धर्मीय वाचतात.
४) इंडोचीन:- (चतुर्भुज एकदंत गणेश) सातवे-आठवे शतकातील व्कांगताम प्रांतात सोअन येथे चतुर्भुज दोन मस्तकी उभी मुर्ती आहे. मागील मस्तक मणुष्याप्रमाने पुढील मस्तक गजमस्तक वाटते. कान मोठे, माथ्यावर कमळपुष्प व शिर जाळीदार वस्त्राने झाकले आहे. गळ्यात रत्नमाला, सर्पाचे जानवे, कमरेभवती व्याघ्रचर्म, तिहेरी पट्टा असून रत्नमुक्त कमळ आहे. हातात मोदक पात्र पाने आहेत. मुर्तीचे कोरीव काम सुंदर असलेने ती सजिव वाटते.
५) मेक्सिको:- (वरुणदेवता) भारतीय संस्कृतीत आदी भौतिक विस्तारित मय संस्कृती असून मेक्सिको येथील कोपानच्या देवळात हि बैठी मुर्ती आहे. वरून देवता नावे बैठीमुर्तीच्या दोन्ही हातात प्रकाश नळ्या आहेत. सोंड मोठी आहे. कपाळावर सुर्यप्रतिक असलेने सुर्यपुत्र नावाने या गणपतीला ओळखतात. डोळ्याच्या भवती सोनेरुपी मढवलेली आहे. अंगावर मय संस्कृती नुसार दागिने आहेत. या मुर्तीत भारत, बुध्द, मय तीन संस्कृतीचा संगम आहे.
६) रोम:- (व्दिभुज गणेश) रोम म्यूसीबोर्गिइओ म्युझियम वेलोस्ट्रेज येथे रोम व भारत संस्कृतीचे एकत्र नमुन्याची मूर्ती आहे. व्दिभुज मूर्तीच्या हातात दौत व लेखनी आहे. मस्तकी शिवलिंग घंटा आहे. पदमासनी बसला आहे. मस्तकी शिवलिंग घंटा पदमासनी बसला आहे. कपाळी नाम मनगटात दंडात वाळे आहेत. डावे कानात त्रिशुळ, मस्तकी मुखूट आकारी गुहा आहे. हा विद्यादायी गुरुस्वामी श्री गणेश गुरु नावाने प्रसिद्ध आहे.
७) अल्वी:- ( श्री गणराज ) हिमालय अतीउंच शिखर रांगेत चीन तुर्कस्तान खोऱ्यात दूर अल्वीत बुद्ध मंदिर प्रवेशद्वारवर हा अग्रपुजा गणेश आहे. हि मुर्ती म्रुगचर्मावर बसली असून दोन्ही बाजूस म्रुग आहेत. चर्तुभुज मुर्तीचे एक हाती सुळा एक हात गुडघ्यावर, एकहाती जपमाळ परशू आहे. पोठ मोठे डोक्यावर पंडीताप्रमाने घेरा. व कपाळावर आडवा नाम आहे. गळ्यात, हातात, दंडात दागिने व जानवे नाहीत यावरून हा बाल गणपती असावा असे म्हणले जाते.
८) मध्य अशिया:- ( श्रीगणेश ) मध्य आशिया खोतान पासून ७५ मैलावर खाडलीकार गांवी ब्राझक्लिक चर्चमध्ये बर्लिन संग्रहालयात १२-४ × २५-५ से.मी. आकाराचे चित्र आहे. ते सर्वधर्म समभावाचे प्रतिक आहे. तपकिरी किनार फिकट हिरवे रंगाचे सुंदर प्रभावळयुक्त हे चित्र आहे. हा गणपती टक्याला टेकून बसला असून डोक्यावर चर्च गुरूचे सम तीन पाकळ्यांचा मुकूट आहे. त्याचे मागील बाजूस इराण, अरब, पध्दतीचा फेटा आहे. निलनयन दोन सुळे मोठे कान आहेत. जरीकाठी पितांबर असून पांढऱ्या पटटयाचे उपरणे आहे. मोत्याचा हार व दंडात दागिने आहेत. एका हातात मोदकपात्र व दुसरा हात मांडीवर ठेवला आहे.
श्री. विजय रामकृष्ण शेंडे.
ब्राह्मणपुरी पाटण.