सातारा : महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळ, मुंबई यांच्यामार्फत राबविण्यात येत असलेल्या प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरु करण्याकरीता इच्छुक संस्थांकडून, व्यवस्थापनांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज व माहितीपुस्तिका मंडळाच्या www.msbve.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. इच्छुक संस्थांनी संकेतस्थळावरुन सन 2018-19 साठी प्रसिध्द केलेल्या माहितीपुस्तिकेमधुन आवश्यक परिपूर्ण माहिती भरलेला अर्ज दि. 15 डिसेंबर 17 ते दि. 16 जानेवारी 2018 पर्यंत नियमित शुल्कासह व दि. 17 ते 31 जानेवारी 2018 पर्यंत विलंब शुल्कासह जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी कार्यालयाकडे जमा करावेत.
प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरु करण्याकरीता इच्छुक संस्थांनी अर्ज करण्याचे आवाहन
RELATED ARTICLES