केळघर ः जावळी तालुक्यातील मेढा,केळघर विभागातील 54 गावांसाठी महत्त्वाचा असणाऱया बोंडारवाडी धरण प्रकल्पासाठी सातत्याने पाठपुरावा करून 54 गावांचा पाणीप्रश्न सोडवण्यासाठी पाठपुरावा करणाऱया खासदार उदयनराजे भोसले यांना पाठिंबा देण्याचा निणर्य बोंडारवाडी धरण कृती समितीने घेतला असून याबाबत बोंडारवा़डी धरण कृती समितीचे निमंत्रक विजयराव मोकाशी यांनी या निवडणुकीत खासदार उदयनराजेंना कृती समितीने पाठिंबा जाहीर केल्याचे प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवले आहे.
बोंडारवाडी धरण कृती समितीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातील अधिक माहिती अशी की,गेल्या पाच ते सहा वषार्ंपासून बोंडारवाडी धरण प्रकल्प मागीर् लागावा यासाठी कृती समितीच्या वतीने सातत्याने पाठपुरावा करीत आहे.गेल्या वषीर् नऊ एप्रिलला नियोजन व जलविज्ञान केंद्र नाशिक यांनी बोंडारवाडी प्रकल्पास पाणी उपलब्धता प्रमाणपत्र देता येणार नाही असे कळवले होते.त्यामुळे कृती समितीने यावेळी 10 मे 2018 ला मोचार्चे नियोजन करून जनआंदोलन करण्याचा इशाराही प्रशासनास दिला होता.त्यावेळी खासदार भोसले यांनी मध्यस्ती करून 5मे 2018 ला पुणे येथे जसलंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रमुख आधिकाऱयांची बैठक सिंचन भवन येथे घेतली होती.त्याच बैठकीत बोंडारवाडी धरणास प्रशासकीय मान्यताही मिळाली होती.त्यानंतर 24-10-2018 रोजी जलसंपदा खात्याने बोंडारवाडी धरणाचा प्रस्ताव तयार करून तो शासनाकडे पाठवला होता.त्यानंतर या धरणासाठी खासदार भोसले यांनी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. बोंडारवाडी धरणाचे सवेर्क्षणाचे काम पूणर् झाले असून 15 फेब्रुवारीला बोंडारवाडीसाठी शासनाने 5.16 द.ल.घनमीटर पाण्याच्या आरक्षणास मंजुरीही दिली आहे.लवकरच जीवन प्राधिकरण या धरणाचा प्रस्ताव मंजुर करेल व धरणाच्या प्रत्यक्ष कामाला सुरूवात होईल, असेही श्री. मोकाशी यांनी पत्रकात नमूद केले आहे.
केवळ खासदार उदयनराजे भोसले यांनी पाठपुरावा केल्यामुळे या लोकसभा निवडणुकीत मेढा, केळघर विभागातील 54 गावांनी बोंडारवाडी धरणासाठी प्रयत्न करणाऱया खासदार भोसले यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहावे, असे आवाहनही बोंडारवाडी धरण कृती समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
बोंडारवाडी धरण कृती समितीचा खा. उदयनराजेंना पाठिंबा
RELATED ARTICLES