पाटण :- (शंकर मोहिते) – आपल्या भारतातील व प्रामुख्याने महाराष्ट्रातील सरकारी व निमसरकारी रुग्णालयाची संख्या मोठी आहे. म्हणजे येथे ससर्वसामान्य आजार हताळण्या साठीची ही रुग्णालये आहेत. सध्या या सर्व रुग्णालयात सर्व प्रकारचे रुग्ण येत आहेत कारोना होईल या भिती पोटी… थोडं काही दुखले खुपले की लोक रुग्णालयात धाव घेत आहेत. त्यांना हे माहीत नाही आपण ज्या ठिकाणी निघालोय तिथे असणारे आजूबाजूचे रुग्ण कसे आहेत. त्यांना काय झाले आहे. इथे या आधी कोणत्या आजाराचा रुग्ण बसून गेला आहे ! परंतु सर्वांनी व रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी लक्षात ठेवले पाहिजे की येथे येणारे सर्व रुग्ण कोरोना बाधित असावेत असेच समजून स्वतःची काळजी घेतली पाहिजे.
परंतु सर्व याच्या विरुध्द होत आहे. असे दिसत आहे. लोकांना हे कळेना का झाले की हा आजार फसवा आहे हा शत्रू न दिसणारा आहे. याला शिवरायांच्या गनिमी काव्याने हरवायला हवे. रुग्णालयात सर्व प्रकारचे रुग्ण एकत्र बसलेले असतात त्या मध्ये काही सांसर्गिक, काही असंसर्गिक व काही कोरोना बाधित ही असू शकतात. सर्वात जास्त धोका असंसर्जिक रुग्णांना म्हणजे ज्यांना अती रक्त दाब, हृदय विकार व डायबेटिस आहे. असे हे रुग्ण ज्यांची शारीरिक प्रतिकार शक्ती कमी झालेली असते व वयो- मानाने थकवा असतो. अशा रुग्णांना लगेच कोरोनाच संसर्ग होऊ शकतो व तो प्रणांतक ठरू शकतो.
एक करोना बाधित व्यक्ती ज्याचे लक्षणे दिसत नसली व तो रुग्णालयात आल्यास त्याच्या कडून किती नवीन करोना रुग्ण तयार होऊ शकतात ते समजून घेऊ
रुग्णालयात रुग्ण गेल्यावर तो कोणा कोणाला भेटत जातो ते पाहू…
केस पेपर काढणे —-> पैसे देणे व घेणे —> रुग्ण प्रतिक्षालयात बसेल —–> रुग्ण डॉक्टर समोर खुडचीत बसेल —-> केस पेपर डॉक्टरकडे देईल —-> गरज असल्यास इंजेक्शन घेईल —-> गरज असल्यास प्रयोग शाळेत तपासण्या —–> शेवटी रुग्ण औषधे घेईल.
…या दरम्यान पैसे घेणे देण्यात कोरोणा इकडचा तिकडे व तिकडचा इकडे होऊ शकतो. जिथे तो रुग्ण बसेल त्या जागेवर कोरोना विषाणू सोडेल. त्याच्या पाठीमागून येणारा रुग्ण या प्रक्रियेने पुढे येईल तसा तो बाधित होत जाईल. म्हणजे त्याच्या नंतर वीस रुग्ण आले असतील तर ते सर्व जण बाधा झालेले असू शकतात. जर ते पुढे जाऊन दहा लोकांना प्रादुर्भाव करत असतील तर जवळ जवळ दोनशे रुग्ण तय्यार होतील व पुढील रुग्ण अशाच गुणाकार पद्धतीत वाढतील. त्यामुळेच रुग्ण संख्या ही गुणाकार पद्धतीत किंवा पटीत वाढतेय. यामुळे सर्वांनी घरीच थांबले पाहिजे गरज नसताना बाहेर जाणे टाळले पाहिजे. व गरज नसताना देखील रुग्णालयात जाणे टाळले पाहिजे. त्याच बरोबर तुम्हाला काही आरोग्य विषयी त्रास असेल तर आशा ताई, अंगणवाडी ताई, गावोगावी घरोघरी येतात त्यांना स्वतःच्या आजारा बाबतीत व्यवस्थित सांगावे ज्या योगे तुम्हाला व तुमच्या घरातील व्यक्तींना कोणता त्रास होणार नाही याची दक्षता घेता येईल.
ही करोनाची साखळी बंद कराची असेल तर काय काय करावे लागेल ते उद्याच्या लेखात सविस्तर पाहूया.
क्रमश… भाग – १
आपला मित्र
श्रीसंपा.
मायक्रो बायो लॉजिस्ट.
शासकीय रुग्णालय महाराष्ट्र.