सातारा : डेक्कन एज्युकेशन सोसायटी पुणेच्या नवीन मराठी शाळा व बालक विद्या मंदिर सातारा यांनी सुवर्ण महोत्सवी वर्षात मोठ्या प्रमाणात राबवलेले कार्यक्रम कौतुकास्पद असून आजही थोरा मोठ्यांचे विचार आदर्शवत आहेत, असे प्रतिपादन बीव्हीजी गु्रपचे संस्थापक अध्यक्ष हणमंतराव गायकवाड यांनी केले.
नवीन मराठी शाळा व बालक विद्यामंदिर यांच्या सांगता समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी डे. ए. सोसायटी पुणे अध्यक्ष प्रा. डॉ. शरद कुंटे होते. यावेळी प्रमुख म्हणून डे. ए. सोसायटीचे उपाध्यक्ष महेश आठवले, कार्यवाह डॉ. श्रीकृष्ण कानेटकर संस्थेचे अध्यक्ष अमित कुलकर्णी, सारंग कोल्हापूरे, कार्याध्यक्ष अनंत जोशी, डॉ. संजीव गोखले, डॉ. मधुसुदन मुजूमदार, आजीव सदस्य डॉ. रवींद्र कुलकर्णी, शाळा समीती सदस्य नारायण आपटे, मुख्याध्यापिका सौ. मंजिरी देशपांडे, मुख्याध्यापिका सौ. सुधा कारंडे यांची विशेष उपस्थिती होती.
प्रारंभी मुख्यध्यापिका सौ. मंजिरी देशपांडे यांनी आपल्या प्रस्थाविक मध्ये शाळेने राबवलेल्या उपक्रमाची माहिती दिली. या प्रसंगी अनंत जोशी यांनी वर्तमान काळाबरोबर भविष्य काळातील आव्हाणांचा विचार व्हावा आणि उद्याची उच्च विद्या विभूशित पिढी सुसंस्कारीत घडावी असे आवाहन आपल्या मनोगतात व्यक्त केले. यावेळी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. प्रा. डॉ. शरद कुंटे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.यावेळी बिव्हीजी गु्रपचे अध्यक्ष हणमंतराव गायकवाड यांनी 11 लाखाचा धनादेश देणगी स्वरुपात मुख्याध्यापिका सौ. देशपांडे यांच्याकडे सपूर्त केला. तसेच बिव्हीजीमध्ये असणारे कर्मचारी अधिकारी यांची विस्तृत माहिती देवून लोकांना कसा रोजगार उपलब्ध झाला याची सविस्तर माहिती दिली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. मनिषा मोरे यांनी केले. आभार सौ. धनश्री यादव यांनी मानले. या कार्यक्रमास नवीन मराठी शाळेचे आजी माजी सेवक वर्ग, विद्यार्थी, पालक, शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
थोर पुरुषांचे विचार आदर्शवत : हणमंतराव गायकवाड ; नवीन मराठी शाळेचा सुवर्ण महोत्सवी सांगता समारंभ उत्साहात
RELATED ARTICLES

