साताराः येथील श्री उत्तर चिदंबरम नटराज मंदिरात शारदीय नवरात्री महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.. यामध्ये सुरु असलेल्या विविध धार्मीक कायर्ंक्रम आज रविवारी अष्टमी आणि नवमीचे औचित्य साधत श्री दुर्गा सप्तशती ,श्री उमादेवीस ललिता सहस्त्रनाम अर्चना, आरती व सुवासिनी/कुमारी पुजा तसेच वेदमुर्ती दत्तात्रय जोशी यांचेकडून सौदर्यलहरी पारायण सुरु आहे. आज रविवार दि 9 ऑक्टों. रोजी सकाळी 8 ते 12 यावेळात चंडीहोम संपन्न झाला. त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.मंदिरात हजर असलेल्या छघेट्या बालिकांची तसेच सुवासिनींची पूजा करुन त्यांना भेटवस्तु तसेच दक्षिणा देण्यात आल्या.
या चंडीहोमासाठी पौरोहित्य करण्यासाठी वेदमुर्ती दत्तात्रय जोशी यांचेसामवेत वेदमूर्ती बुवा गुमास्ते गुरुजी. वेदमूर्ती जगदीश भट व इतर ब्रह्मवृंद हजर होते. या होमासाठी मंदिराचे व्यवस्थापकिय विश्वस्त रमेश शानभाग व सौ. उषा शानभाग यांचे हस्ते संकल्प करण्यात आला , त्यानंतर मंत्र घेाषात आहूती दान करण्यात आले दुपारी हवन आवर्तने पुर्णं झाल्यावर होमाची सांगता पूर्णाहूतीने करण्यात आली.
त्यानंतर प्रज्ञदाचे वितरण करण्यात आले. मंदिरात नवरात्रीचे औचित्य साधून श्री उमा देवीस विविध प्रकारच्या पूजा बांधण्यात येत आहेत.त्यामध्ये विशेष अलंकार पुजा, चंदनलेप पुजा, सरस्वती देवी रुपातील पूजा, शाकंबरी रुपातील पूजा, विविध फळे आणि भाज्यांची आरास करण्यात येत आहेत. उद्या सोमवार दि 10 ऑक्टोबर रोजी सायं 6 वा समस्त महिला वर्गाकडून दीपपुजा संपन्न होणार आहे.
या आयोजित पुजाविधीत मंदिराचे विश्वस्त मुकुंद मोघे,रणजीत सावंत, नारायण राव, व्यवस्थापक चंद्रन, राहूल घायताडे, संकेत शानभाग, रमेश हलगेकर,शीतल शिंदे, श्री.शहाणे ,मंदिराचा पुजारी वर्ग तसेच सातारकर नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नटराज मंदिरात श्री शारदीय नवरात्री महोत्सवात चंडीहोम
RELATED ARTICLES