माण तालुक्याचा बर्याच वर्षापासून प्रलंबित असणारा उरमोडी योजनेचा पाण्याचा प्रश्न अखेर माण खटावचे आमदार जयकुमार गोरे यांनी पूर्ण ताकद लावून माण तालुक्यातून वाहणार्या माणगंगा नदीच्या अगदी शेवटच्या टोकापर्यंत पाणी आणून दाखवले आहे. या त्याच्या प्रयत्नांना निसर्गानेही भरभरून दाद दिली असल्याचे दिसून येत आहे. आमदार गोरे यांना विकासकाम असू द्या किवा कोणतीही निवडणूक असू द्या यात त्यांना निसर्गाचीही साथ लाभल्याचे दिसून आले आहे. कारण माणसाचे नुसते कर्तुत्व श्रेष्ठ असत नाही त्याला नशीबाचीही साथ लागते आणी या दोन्हीही गोष्टीची साथ त्याना सुरवातीपासुनच मिळाल्यामुळे आमदार गोरे हे मुकद्दर का सिकंदर ठरले आहेत.
माण तालुक्याला मिळणारे उरमोडी योजनेच्या पाण्याचा प्रश्न बर्याच वर्षापासून रखडलेला होता या तालुक्याला वरदान ठरणार्या योजनेच्या पाणी प्रश्नावर पूर्वीच्या लोकप्रतिनिधीनी तीन पंचवार्षिक निवडणुका लढवल्या मात्र पाणी प्रश्न सुटला नव्हता. तोच पाणीप्रश्न घेवून 2009 साली तालुक्याच्या राजकारणात प्रवेश करणार्या आमदार गोरे यांनी गेल्या सहा वर्षात या योजनेचे पाणी तालुक्याच्या शेवटच्या टोकापर्यंत आणुन दाखवल्याची वस्तुस्थिती नाकारून चालणार नाही. राजकारणातील डावपेच काही असू द्या हे पाणी कोणी आणले कसे आणले यावरून आरोप प्रत्यारोपही झाले आहेत मात्र खर्या अर्थाने या योजनेला गती देण्याचे काम आमदार गोरेनीच केल्याचे दिसुन येते. कारण या पूर्वीच्या लोकप्रतिनिधीनी नुसत्या निवडणुकी पुरताच हा प्रश्न घेतला होता. निवडणुका झाल्यावर त्या प्रश्नावर कोणीही परत बोलल्याचे दिसले नाही मात्र, आमदार गोरे यांनी या योजनेचे पाणी तालुक्याला मिळण्यासाठी तत्कालिन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे पाठपुरावा करून गती दिल्याचे वेळोवेळी दिसून आले. या योजनेच्या केनोलचे काम किरकसाल नरवणे पर्यंत पूर्ण झाले आहे. याचाच अभ्यास करून आमदार गोरे यांनी किरकसाल बोगद्यापर्यत आलेले पाणी हे गोंदवले खुर्दच्या ओढ्यात सोडून ते पाणी माणगंगा नदीत सोडले. व या नदीवर पळशी घुबडकडा, शेळकेवस्ती, भोसलेवस्ती, वाकी, वरकुटे,विश्रामगृह म्हसवड हे बंधारे पूर्ण क्षमतेने भरून ते पाणी म्हसवड शहराच्या यात्रा पटागंणा लगत माणदेशी फौंडेशनने बाधलेल्या बंधार्यावरून पडू लागल्याने उरमोडीचे पाणी प्रत्यक्षात माण तालुक्यात पोहोचल्याचे जनतेने पाहिले. या फौंडेशनच्या बंधार्यामुळे अडलेल्या पाण्यामुळे या भागातील नदीपात्रात सद्या बोटींग सुरू आहे. या बोटींगमुळे शहरातील स्त्री-पुरूषांना व अबालवृध्दाना एक वेगळाच आनंद मिळत आहे. तर त्यातच पालिकेच्या माध्यमातून उभारलेल्या व उद्घाटनाच्या प्रतिक्षेत असलेले गार्डन ही या नदीपात्रातील अडलेल्या पाण्याच्या किनारीच असल्याने शहराच्या वैभवात आणखीच भर पडत आहे. अशात बाहेरगावाहून श्री सिध्दनाथाचे दर्शनाला येणार्या भाविकांना हे दृृष्य अचंबित करत असून या बोटींग भुरळ पडत आहे.
एकंदरीत आमदार जयकुमार गोरे यांनी आणलेल्या उरमोडी योजनेच्या पाण्यामुळे माणगंगा नदी किनारी वसलेल्या म्हसवड शहर हे आता रोलमॉडेल ठरू लागले आहे. सध्या परतीचा पाऊस सुरू असून पाण्याच्या पातळीत वाढ होऊन हे जादा पाणी फौंडेशनने बाधलेल्या बंधार्यावरून खाली पडून या नदीवरील शेवटचा राऊतवाडी येथील बंधाराही भरून वाहू लागला असल्याने आमदार गोरे यांनी प्रयत्न करून आणलेल्या योजनेच्या पाण्याला आता निसर्गानेही गती दिल्याचे दिसत आहे एकंदरीतच आमदार गोरे यांच्या प्रयत्नाना निसर्गाचीही साथ मिळत आसल्याने ते सध्या माण-खटावच्या राजकारणात मुकद्दर का सिकंदर ठरले आहेत.