पुसेगाव : पुसेगावमधील श्री. सेवागिरी देवस्थान ट्रस्टची पंचवार्षिक निवडणुक काही दिवसावर येऊन ठेपल्याने या निवडणुकीत कोण बाजी मारणार याची चर्चा पुसेगाव व परिसरात चांगलीच रंगू लागली आहे.
नागरिक संघटना सत्ता आबाधित राखणार का? जनशक्ती आणि ग्रामविकास संघटना नागरिक संघटनेच्या सत्तेला सुरूंग लावणार हे येणारा काळच ठरवणार आहे, उमेदवारी अर्ज दाखल करून डॉ. सुरेश जाधव यांच्या नेतृत्वाखालील श्री. सेवागिरी नागरिक संघटनेने पहिली बाजी मारली असून जनशक्ती आणि ग्रामविकास संघटना यांचे उमेदवार आपला अर्ज कधी दाखल करणार यावर सवार्ंच्या नजरा खिळल्या आहेत.
मागील ग्रामपंचायत निवडणुकीत रणधीर जाधव यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायतीवर जनशक्ती संघटनेने एक हाती सत्ता मिळवली. घराणेशाहीला विरोध करत आपली जनसामान्यांची जनशक्ती संघटना स्थापन करत प्रमुख तरूण कार्यकर्त्यांची मोट बांधली त्यामुळे न भुुतो न भविष्यातो असे यश पदरात पडल्याने यंदा जनशक्ती कोणते उमेवार देते यावरच निवडणुकीचे गणित राहणार आहे. युवा नेते रणधीर जाधव यांच्या नावाबरोबर सुरेश जाधव, संदिप जाधव, अंकुश पाटील, सुशिल मुळे, अॅड. श्रीकृष्ण जाधव, टी. एन. जाधव, प्रविण जाधव, धनंजय जाधव, सोपान जाधव, अनिल बोडके यांच्या नावाची चर्चा आहे पण उमेवारी निवडताना सर्व वार्ड आणि इतर समाजाला प्रतिनिधीत्वावरच भिस्त राहणार आहे. एकाच घरात दोन पदे देण्याचे टाळल्यास जनशक्तीचा वारू कोणीच रोखू शकणार नाही.
नागरिक संघटनेने प्रचारापासूनच उमेदवारी अर्ज दाखल करण्यापयर्ंत आघाडी घेतल्याने प्रचाराची एक फेरी पुर्ण केली आहे. सद्या पुसेगावमध्ये नवरात्र उत्सव असल्याने अनेक आरती पासून मंडळाच्या उपक्रमात नागरीक संघटनेच्या संभाच्या उमेदवारांचा वावर आढला आहे. डॉ सुरेश जाधव यांच्या बरोबर पंचायत समीती सदस्य मोहनराव जाधव, सुनिलशेठ जाधव, संतोष जाधव, संतोष तारळकर, योगेश देशमुख, प्रताप जाधव यांनी उमेवारी अर्ज दाखल केला असून आता यापैकी कोण सहा उमेदवार असतील यावर खलबते सुरू आहेत.