
( फोटो व बातमी —संजय दस्तुरे, महाबळेश्वर )
महाबळेश्वर : महाबळेश्वर या थंड हवेच्या पर्यटन स्थळाकडे येणारे सर्व रस्ते खड्डेमय व निकामी झाले असून पाचगणी – महाबळेश्वर रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. खराब रस्त्यांमुळे अनेक अपघातही झाले आहेत व होत आहेत. सार्वजनिक बांधकाम खात्याला याबाबत सांगितले तरी वरिष्ठ अधिकार्यापासूनच सर्वजण काही तरी न पटणारी उत्तरे देवून तोंडाला पाने पुसतात .मात्र दिवसेंदिवस खड्डे व त्यापासुनचा धोका वाढतच आहे. महाबळेश्वरवरून पांचगणीला शिकण्यासाठी दररोज सुमारे 100 ते 150 मुले वाहनांमधून जा ये करीत असतात. या खराब रस्त्यांचा त्रास त्या मुलांना सहन करावा लागतो आहे. त्यामुळे या मुलांनीच आत्ता यात लक्ष घालायचे ठरविले असून या मुलांनीच आज येथे चिल्लर मोर्चा काढून सार्यांचेच लक्ष वेधले व अधिकार्यानाही गांधीगिरी करून धडा शिकविला व जाग आणली. यात पहिली पासून 10 वी पर्यंत शिक्षण घेणारे बाल चामुंचाच पुढाकार असल्याने आजचा मोर्चा अन्य नेहमी निघणार्या मोर्चापेक्षा अत्यंत लक्षवेधी होता .या मोर्चामध्ये मुलांचे पालक, नागरिक ही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
महाराष्ट्राचे नंदनवन म्हणून प्रसिध्द असलेल्या महाबळेश्वर कडे वाई वरून येणारा रस्ता असो व मेढामार्गे साताराहून येणारा रस्ता असो व पोलादपूर मार्गे कोकणातून येणारा रस्ता असो सर्व रस्ते खड्डेमय व धोकादायक झाले असून त्याचा त्रास महाबळेश्वर स्थानिकांप्रमाणे येथे फिरायला येणार्या पर्यटकांना होत आहे.वाहनधारक तर या खड्डेमय रस्त्यांमुळे महाबळेश्वरला येण्याचे टाळतच आहेत. कारण या रस्त्यातील खड्ड्यामुळे अपघात होण्याचे मोठे प्रमाण असून पावसाळा संपला तरी ते भरण्याची व रस्ता तयार करण्याची काहीच चिन्हे दिसत नाहीत. या वर्षीची या पर्यटन स्थळाची दिवाळी खड्ड्यातच गेली तरी सुद्धा शासनाला व संबंधित खात्याला जग येत नसल्याने नागरिकांसह पर्यटकांच्यात संतप्त भावना आहे.मध्यंतरी युवासेनेच्या वतीने भव्य मोर्चा कडून या खात्याला सुमारे आठ दिवसांचा अल्टिमेटम देण्यात आले होते तसेच मनसेच्या वतीनेही मोर्चा काढण्यात आला होता परंतु परिस्थिती जैसे थे राहिली. त्यामुळेच आज महाबळेश्वरहून पांचगणीला इंग्रजी व मराठी शाळेला जाणर्या पहिली ते दहावीच्या सुमारे 70 ते 80 मुला मुलिंनी मिळून त्यांनी चिल्लर बालक नावाने एकत्र येवून त्यांनी सार्वजनिक बांधकाम खात्यावर मोर्चा काढला व त्यांनी बांधकाम खात्याचे उप विभागीय अभीयंता हेमंत पाटील यांना निवेदन देवून खड्डे मय रस्त्यामुळे होणार्या त्रासाबाबत आपली गार्हाणी मांडली.कारण दररोज या मुलांना शाळेसाठी पांचगणीला वाहनांमधून जावे लागते. व खराब रस्त्यामुळे त्यांना शाळेला उशीर होते. अनेकांना वेळेवर नाआल्याने शिक्षा सोसावी क्लागते ,अनेकांचे परीक्षांचे वेळेवर पोहचू न शकल्याने नुकसान होते तर अनेकांना खड्डेमय रस्त्यांमुळे मन दुखी ,पाठीचे मणके दुखीचा त्रास सुरु झाला आहे.त्यामुळे येथील पावसाला संपला तरी कोणीच या त्रास कडे लक्ष देत नाही न्हाणून या बालचमूंनी हा लोकशाही अनोखा मार्ग आवलंबत चिल्लर मोर्चा काढला. आपल्या नातवंडासारखी मुले भर उन्हात निघालेल्या या मोर्चात सहभागी असल्याचे पाहून अनेकांची माने हेलावून गेली होती.
दरम्यान, या मोर्चात पांचगणी येथील किमिंस, सेट पीटर, सेंट जोसेब, संजीवन विद्यालय, न्यू इरा, बाथा हायस्कूल, सिल्व्हर डेन, विद्या निकेतन, कडल्स व अन्य इंग्रजी व मराठी माध्यमांच्या शाळा कॉलेजला जाणारी मुले मुली, बाल चमू मोठ्या संखेने सहभागी झाले होते. त्यांच्या हातात खड्डामय रस्ता व त्यामुळे वाहनाशी विध्यार्थ्याबरोबर झालेला अपघात असे चित्र असलेला फलक व त्यावर विध्यर्थी चिल्लर मोर्चा असे लिहून वाई – महाबळेश्वर रस्ता – चला थंड हवेच्या गावी जाऊ असे वरती लिहिले होते तर खालती बक्षीस वितरण शालेय बालक चिल्लर मोर्चा,महाबळेश्वर फिरायला येताय……आयोजक महाराष्ट्र शासन व पी.डब्लू.डी.सातारा असे गांधीगिरी करीत खोचक लिहले होते.
हा मोर्चा येथील सुभाषचंद्र बोस चौकातून डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक मार्गे मुख्य बाजार पेठेतून शिवाजी सर्कल चौकात गेला .जातानामोर्चात सहभागी झालेले पालक निषेदार्थआपली व्यथा मांडणार्या घोषणा देत पाठी मागून मोर्चात सहभागी झाले होते .यात शिवसेना जिल्हाअध्यक्ष राजेश उर्फ बंडा कुंभारदरे, उद्योजक व पालक गिरीश नायडू, आशिष नायडू, शिवसेना माजी जिल्हाध्यक्ष गोपाळभाऊ वागदरे,शिवसेना शहर अध्यक्ष विजय नायडू, नगरसेवक व पालक किसनशेठ शिंदे, सलीम बागवान, पालक बाळासाहेब साळुंखे, चंदू डोईफोडे, सुरेश गाडे, कासम महापुळे, पिंटू उर्फ पंकज येवले, सचिन पवार, गोविंद कदम, राकेश भोसले, इरफान शेख, सुरेश फळणे, नाना कदम, महाबळेश्वर अर्बन बँकेचे उपाध्यक्ष सी.डी.बावळेकर, अंकुश नाना बावळेकर, सुरेश जाधव, प्रवीण वागदरे आदी पालक मोठ्या संखेने उपस्थित होते. मोर्चा शिवाजी सर्कल चौकात आल्यावर सार्वजनिक बांधकाम काह्त्याचे उप विभागीय अभियंता हेमंत पाटील यांना बोलावून निवेदन देण्यात आले व त्वरित रस्त्यांचे काम सुरु करावे अशी मागणी चिल्लर मोर्चाचे प्रतिनिधी प्रणीका आशिष नायडू, श्रीजा केतन यादव, अनुष्का खुरासने, अन्वी यादव, आश्मिथ साळुंखे यांनी केली व आपल्या व्यथा -त्रास याबद्धल अधिकार्यांना माहिती दिली. आपण दोन दिवसात खड्डे बुजवायला सुरु करू असे या अभियंता पाटील यांनी यावेळी मोर्चा ला सांगितले. यावेळी पोलीस निरीक्षक दत्तात्रय नाळे यांच्यासह पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने बंदोबस्तासाठी उपस्थित होते.