Wednesday, March 19, 2025
Homeठळक घडामोडीनगरपरिषद व 125 नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदांचे आरक्षण जाहीर

नगरपरिषद व 125 नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदांचे आरक्षण जाहीर

मुंबई :  राज्यातील 3 नवनिर्मित नगरपरिषद व 125 नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदांच्या आरक्षणाची सोडत आज नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांच्या हस्ते काढण्यात आली. यावेळी उपसचिव संजय गोखले, सुधाकर बोबडे, सतीश मोघे आदी उपस्थित होते. नवनिर्मित तीन नगर परिषद पैकी वाना डोंगरी ही नगरपरिषद नागरिकांच्या मागास प्रवर्गातील महिलांसाठी राखीव झाली असून उर्वरित हुपरी (कोल्हापूर) आणि आमगाव (गोंदिया) या परिषदा खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षित झाल्या आहेत. नगरपंचायतींचे आरक्षणासाठी राज्यातील 125 नगर पंचायतींपैकी 15 या अनुसूचित जातींसाठी, 12 अनुसूचित जमातींसाठी, 34 नागरिकांच्या मागासप्रवर्गासाठी आणि उर्वरित 64 या खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात आल्या आहेत.
 खुला प्रवर्ग सर्वसाधारण
मुलचेरा, समुद्रपूर, तिवसा, झरी, मेढा, देवनी, गौंडपिंपरी, वडूज, लोणंद, शिरुर,जळकोट, सोयगाव, पेठ, सडक-अर्जुनी, पाटण, खंडाळा, लोहारा ब्रु., कुडाळ, संग्रामपूर, बाभूळगाव, साक्री, अर्जुनी, औंढा-नागनाथ, सावली, कवठे-महांकाळ, दहीवडी, वाशी,घनसावंगी, तळा, बार्शी-टाकळी, कणकवली, केज,
खुला प्रवर्ग (महिला)
म्हसळा, विक्रमगड, मोहाडी, सुरगणा, माणगाव, पारनेर, तलासरी, कडेगाव, मालेगाव-जहांगीर, माढा, मौदा, सिंदेवाही, लाखांदूर, चाकूर, वडवणी, माळशिरस, भामरागड, कसई-दोडामार्ग, शिराळा, अहेरी, कुही, धानोरा, लाखणी, राळेगाव, भिवापूर, देवरी, अर्धापूर,मोखाडा, धडगाव-वडफळ्या, दिंडोरी, शहापूर, नेवासा,
 नागरिकांचा मागास प्रवर्ग
जाफराबाद, गुहागर, खानापूर, कोरेगाव, मंठा, शिर्डी, लांजा, हिंगणा, नांदगाव-खंडेश्वर, हिमायतनगर, सेलू, आष्टी (वर्धा), गोरेगाव, पोलादपूर, मोताळा, फुलंब्री, मलकापूर
नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
अकोले, मंडणगड, माहूर, देवरुख, देवगड-जमसांडे, दापोली, पारशिवनी, कळंब,रेणापूर, आष्टी (बीड), बोदवड, शिंदखेडा, कारंजा, आजरा, देवळा, मुरबाड, वाभवे-वैभववाडी,
 अनुसूचित जाती
मानोरा, चामोर्शी, नायगाव, सेनगाव, आरमोरी, बदनापूर, महादूला
 अनुसूचित जाती (महिला)
कर्जत, पाटोदा, कोरपना, महागाव, शिरुर-अनंतपाळ, पालम, सिरोंचा, पोंभूर्णा
अनुसूचित जमाती
कोरची, खालापूर, कळवण, निफाड, धारणी, सालेकसा
अनुसूचित जमाती – महिला
कुरखेडा, भातकुळी, एटापल्ली, वाडा, जिवती, मारेगाव

 

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular