सातारा : ऐतिहासिक वारसा स्वच्छता व संवर्धन मित्रमंडळाच्यावतीने चारभिंती येथे स्वच्छता व संवर्धन मोहीम राबविण्यात येत आहे. या स्वच्छता मोहीमेची सुरवात काल दि . ८ डिसेंबर रोजी झाली . कालच्या पहिल्या दिवशी पायथा,पार्किंगसह मुख्य प्रवेश कमानीपर्यंत स्वच्छता करण्यात आली. त्यात सुमारे ४ पोती कचरा गोळा करण्यातआला. आज दुसऱ्या दिवशी मुख्य कमान ते भिंतीच्या मध्यापर्यंत स्वच्छता करण्यात आली. सुमारे ३.३० तास चाललेल्या या स्वच्छता मोहीमेच्या दुसऱ्या दिवशी ८ पोती कचरा व काचेच्या दारूच्या बाटल्या गोळा करण्यात आल्या. उद्या तिसऱ्या दिवशी मध्यवर्ती भिंत ते मुख्य स्मारक या संपूर्ण भागाची स्वच्छता करण्यात येणार आहे. या स्वच्छता मोहिमेत शुभम मांडवेकर ,उत्कर्ष शिंदे,रोहन शेलार, प्रज्योत वडेट्टीवार, शुभम आवळे, अमेय कुलकर्णी, ओमकार कदम, सुरज देशमुख,निलेश शिंगाडे,अक्षय ताटे,अभिजीत मुरकुटे, अक्षय शेलार,ओमकार शिंदे, ऋषीकेश गायकवाड, रोहित ताटपुजे,विशाल मोहिते, अनिकेत कर्णे आदी सदस्य सहभागी झाले आहेत . सदर मित्रमंडळातर्फे नागरिकांना चारभिंती व अन्य ऐतिहासिक महत्त्व प्राप्त ठिकाणी स्वच्छता राखण्याचे व विद्रुपीकरण न करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
ऐतिहासिक वारसा स्वच्छता व संवर्धन मित्रमंडळाच्या वतीने चारभिंती स्वच्छता व संवर्धन मोहीम
RELATED ARTICLES