मायाणी :-(सतीश डोंगरे मायणी) येथील प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या पुढाकाराने गरोदर महिलांसाठी महा ई सेवा आणि महा ऑनलाईन जिल्हाधिकारी कार्यालय सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मोफत आधार कार्डाची सुविधा उपलब्ध करण्यात आली होती . यावेळी प्राथमिक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ तेजपालसिंग चव्हाण,महा ई सेवा महाऑनलाईन चे संजय क्षीरसागर, प्रवीण देशमुखे,सर्व कर्मचारी वर्ग,आरोग्य सेविका,व नागरिक उपस्थित होते .
आज शासनांमार्फत प्राथमिक आरोग्य केंद्र येथे विविध योजनांच्या सुविधा देण्यात येत आहेत.त्यातीलच गरोदर महिलांसाठी अनेक सुविधा सध्या उपलब्ध आहेत. आणि शासनाकडून मिळणाऱ्या लाभासाठी बँक खाते असणे आवश्यक बनल्याने व त्यासाठी आधारकार्ड ची आवश्यकता असल्याने या ठिकाणी मोफत आधारकार्ड महिलांना देण्यात आले.त्यामध्ये आधारकार्ड नावात बदल करणे,नवीन आधारकार्ड तयार करणे याचा समावेश होता .
यावेळी मायणीचे सरपंच सचिनभाऊ गुदगे यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे भेट देऊन मोफत आधारकार्ड सुविधेची पाहणी केली. तसेच सुविधेबद्दल महा ई सेवा,व महाऑनलाईन चे संजय क्षीरसागर यांचा मायणी ग्रामपंचातीच्या वतीने शाल ,श्रीफळ देऊन सन्मान केला.यावेळी ग्रामपंचायत सदस्य जगन्नाथ भिसे,आनंदा शेवाळे,व दिनकर कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.