मुख्यमंत्र्यांचा हल्लाबोल, राणे आणि धनंजय मुंडे चेकमेट!
मुंबई : जिनके घर काच के होते है, वो दुसरों के घरपर पत्थर नहीं फेंका करतें, असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसचे नेते नारायण राणेंवर टीकास्त्र सोडले आहे. नारायण राणे यांच्या म्हणण्याप्रमाणे राज्यात तीन नव्हे एकच मुख्यमंत्री आहे. आणि मी सक्षम आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नारायण राणे यांच्यावर टीका केली आहे. आज विधानपरिषदेत विविध मुद्दे उपस्थित करण्यात आले होते. यावेळी विरोधी पक्षातील नेत्यांनी सरकारवर केलेल्या आरोपांवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी सडेतोड उत्तर दिले आहे.
मी एकच मुख्यमंत्री
कालच चर्चेदरम्यान नारायण राणे यांनी महाराष्ट्राला तीन मुख्य मंत्री असल्याचे म्हटले होते. यावर फडणवीस यांनी नारायण राणे यांना सुनावले. फडणवीस म्हणाले, मनारायण राणे साहेब, तीन मुख्यमंत्र्यांची सवय तुम्हाला असेल. राज्यात मी एकटाच मुख्यमंत्री आहे. आणि मी सक्षम आहे. जनताच माझं मुख्यमंत्री म्हणून मूल्यमापन करेल. राणे साहेबांना राग आल्यानंतर ते रागाच्या भरात बोलतात, मात्र, आम्ही त्यांचे म्हणणे गांभीर्याने घेत नाही.
विरोधी पक्षाच्या नेत्यांनी सरकारकडे अनेक मागण्या केल्या आहेत. भाजपला गुंडांचा पक्ष म्हणता. मग, त्या कशा काय केल्या? असा सवालही त्यांनी केला. आमचा मंत्री जर दोषी ठरला तर मी राजीनामा देईन. सिंधुदुर्गात कोणावर काय गुन्हे आहेत, हे जर सांगितले तर कुठला पक्ष गुंडांचा आहे, हे समोर येईल. असे फडणवीस यांनी राणे यांच्या टीकेला उत्तर दिले आहे.
धनंजय मुंडेंवरही टीकास्त्र
फडणवीस यांनी धनंजय मुंडे यांच्यावरही टीकास्त्र सोडले. विरोधी पक्षनेत्यांनी विचार न करता आरोप केले आहेत. कोपर्डी अत्याचार प्रकरणासंदर्भात कॅबिनेट मंत्री राम शिंदेंसोबत आरोपीचा चुकीचा फोटो कसा काय दाखवला गेला. ज्यामध्ये काही तथ्य नाही. मग हा खटाटोप कशासाठी. विरोधी पक्षनेत्यांनी जबाबदारीने आरोप करणे आवश्यक होते, असे मुख्यमंत्री म्हणाले.
मुख्यमंत्र्यांनी राम शिंदे यांना वाचवण्यासाठी आरोपीचा फोटो दाखवला होता, असा आरोप धनंजय मुंडेंनी केला होता. यावर फडणवीस यांनी उत्तर दिले आहे.
कोपर्डी अत्याचार प्रकरणाचे पडसाद
कोपर्डी अत्याचार प्रकरणावर चर्चा करण्यात आली. फडणवीस म्हणाले, मकोपर्डी अत्याचाराची घटना अत्यंत गंभीर आहे. ही घटना घडल्यानंतर पोलिस 31 मिनिटांत घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी दिरंगाई केली नाही. तत्काळ गुन्हा दाखल केला गेला. या प्रकरणातील तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. चौथा आरोपी विजय शिंदेची चौकशी सुरु आहे. आरोपींना फाशीची शिक्षा होईल. हा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालणार आहे. पीडित कुटुंबाला भेटण्याची तयारी आहे.
विरोधी पक्ष नेत्यांनी जे जे आरोप केले, त्याला देवेंद्र फडणवीस यांनी चोख उत्तर दिले आहे.
जिनके घर शीशे के होते है, वो दुसरों के घरपर पत्थर नहीं फेंका करतें
RELATED ARTICLES